शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मन्मथमाऊली, गुरुराज माऊली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:57 IST

‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रेत कानी पडत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘मन्मथ माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, हर-हर महादेव’चा जयघोष श्रीक्षेत्र कपिलधार परिसरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रेत कानी पडत होता. श्रीक्षेत्र कपिलधार येथे शिवयोगी संत मन्मथस्वामी महाराजांनी वयाच्या २६ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली होती. मन्मथस्वामींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या याठिकाणी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. राज्यासह इतर राज्यातून याठिकाणी ५० दिंड्या आल्याचे श्रीक्षेत्र कपिलधार मन्मथस्वामी देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले. घाटमाथ्यावर विद्युत व्यवस्था केल्यामुळे सुविधा झाली असून, सीसीटीव्हीची व्यवस्था येथे आहे.शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज, सोमेलिंगेश्वर बिचकुंदा महाराज, आ. जयदत्त क्षीरसागर, बिचकुंदाचे आ. हनमंत पाटील यांच्यासह शिवाचार्य व मन्मथस्वामी देवस्थान पंचकमिटी सदस्यांच्या उपस्थितीत रीतिरिवाजाप्रमाणे महापूजा झाली. आ. विनायक मेटे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी भेट देऊन दर्शन घेतले. शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह पदाधिका-यांनी दर्शन घेतले.शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, सिध्दलिंग महाराज साखरखेर्डेकर, सिध्देश्वरलिंग महाराज, मठ संस्थान गडगा, नीळकंठ महाराज धारेश्वर, राचलिंग महाराज परंडकर, महादेव महाराज कळमनुरी, शंकरलिंग महाराज शिरूर अनंतपाळ, सांबसदाशिव महाराज थोरला मठ वसमत, दिगंबर महाराज वसमत, सुवानंद महाराज तमलूर, करबस्व लासीना मठ वसमत, नंदिकेश्वर महाराज पुर्णेकर, प्रभुदेव महाराज माडेकर, गंगाधर महाराज औंधकर बार्शी, मनिकंठ स्वामी रेवडकर मठ बार्शी, गुरूपाद शिवाचार्य गिरगावकर महाराज यांच्यासह ५० शिवाचार्य श्रीक्षेत्र कपिलधार येथे उपस्थित होते.यात्रोत्सवासाठी विश्वस्त कमिटीचे दोनशे स्वयंसेवक कार्यरत होते. परिसरात वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्नीशामक यंत्रणा सज्ज होती. मन्मथस्वामी देवस्थान पंचकमिटीचे वैजनाथअप्पा मिटकरी, बाबासाहेब कोरे, सोमनाथअप्पा हालगे, अ‍ॅड. शांतीवीर चौधरी, नागेश मिटकरी, विश्वनाथअप्पा संगशेट्टी, आश्रुबा रसाळ, सिद्धलिंगअप्पा टेकाळे, अ‍ॅड. उमाकांतअप्पा पाटील, अ‍ॅड. विजयकुमार कोरे, मन्मथअप्पा गिरवलकर, मल्लिकार्जुनअप्पा इंदे, दिगांबरअप्पा नगरकर, विष्णुपंत वाघमारे, शिवशंकर भुरे, विजयकुमार मेनकुदळे, सुनील रुकारी, जगन्नाथअप्पा वाडकर आदींसह वीरशैव बांधव परिश्रम घेत होते.