आशपाक पठाण लातूरमहापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४०७ उमेदवारांपैकी ४९ उमेदवार कोट्याधीश आहेत़ यात सर्वाधिक २५ कोटी रुपयांची मालमत्ता राजा मणियार यांची आहे़ तर मकरंद सावे यांची २३ व ओमप्रकाश पडीले हे १९ कोटीचे धनी आहेत़ जंगम व स्थावर मालमत्तेत पहिल्या तीनमध्ये या तिघांचा समावेश आहे़ ४०७ उमेदवारांपैकी ४९ जण कोट्याधीश आहेत़ तर जवळपास ३१७ उमेदवार लखपती आहेत़
मनपात निवडणुकीत ४९ उमेदवार कोट्यधीश
By admin | Updated: April 17, 2017 23:35 IST