शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

मनीषाचे एव्हरेस्टच्या दिशेने मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:24 IST

मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिचे जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण सुरू आहे. इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असणाऱ्या मनीषा वाघमारे हिने १९ हजार ५०० फूट उंचीवर असणाºया कॅम्प १ वरून शुक्रवारी कॅम्प २ पर्यंत मजल मारली आहे. आज रात्री २ ते ३ च्या सुमारास मनीषा ८ हजार ८४० मीटर उंचीवर असणाºया एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प ३ कडे कूच करणार आहे.

ठळक मुद्देकॅम्प २ वर पोहोचली : आता कॅम्प ३ कडे कूच

औरंगाबाद : मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिचे जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने यशस्वीपणे मार्गक्रमण सुरू आहे. इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट असणाऱ्या मनीषा वाघमारे हिने १९ हजार ५०० फूट उंचीवर असणाºया कॅम्प १ वरून शुक्रवारी कॅम्प २ पर्यंत मजल मारली आहे. आज रात्री २ ते ३ च्या सुमारास मनीषा ८ हजार ८४० मीटर उंचीवर असणाºया एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प ३ कडे कूच करणार आहे.या वर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या मनीषाने १७ मे रोजी रात्री एक वाजता बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट शिखराच्या कॅम्प १ कडे कूच केली होती. २० रोजी एव्हरेस्टच्या कॅम्प ४ वर पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान अनुकूल असल्यास ती २० मे रोजीच जगातील सर्वोच्च उंचीवर असणारे एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्यासाठी निघणार असून ती २१ रोजी सकाळी एव्हरेस्टच्या सागरमाथ्यावर असेल अशी शक्यता आहे.गतवर्षी निसर्गाने रौद्ररूप धारण केल्यामुळे मनीषा वाघमारे एव्हरेस्ट सर करण्यापासून अवघ्या १७० मीटरपासून वंचित राहिली होती; परंतु या वर्षी नव्या उमेदीने व जिद्दीने ती ४ एप्रिल रोजी एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना झाली होती. त्याच दिवशी ती काठमांडू येथे पोहोचली होती. त्यानंतर तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी तिने ४५ दिवसांच्या कालावधीत कालापथ्थर, पमोरी हाय कॅम्प तसेच २८ एप्रिल ते १ मेदरम्यान तिने बेस कॅम्प ते कॅम्प १, कॅम्प २ आणि कॅम्प ३ असे रोटेशन्स केले होते.