शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

क्रीडा कार्यालयाचा गलथान कारभार !

By admin | Updated: August 21, 2014 01:22 IST

सोमनाथ खताळ , बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मंगळवारपासून बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात येत आहेत. मात्र या स्पर्धेत कुठलेही नियोजन नसल्याने आलेल्या खेळाडूंना अनेक

सोमनाथ खताळ , बीडयेथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये मंगळवारपासून बॉक्सिंग स्पर्धा घेण्यात येत आहेत. मात्र या स्पर्धेत कुठलेही नियोजन नसल्याने आलेल्या खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे बॉक्सिंग स्पर्धेत एखाद्या खेळाडूला इजा झाली तर तात्काळ उपचार करण्यासाठी कुठलीही काळजी या कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जखमी खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परीषद, बीड यांच्या मार्फत जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेला मंगळवारी सुरूवात करण्यात आली. स्पर्धेला सुरूवात होण्याच्या दिवसापासूनच या स्पर्धेचे ढिसाळ नियोजन असल्याचे पहावयास मिळाले. सकाळी ११ वाजता स्पर्धेला सुरूवात होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात या स्पर्धेला दुपारी दोनच्या सुमारास सुरूवात झाली. स्पर्धेला उशिरा सुरूवात होण्याला केवळ क्रीडा कार्यालयच नव्हे तर सहभागी खेळाडू व त्यांचे प्रशिक्षकही तेवढेच जबाबदार होते. कारण कोणताही संघ वेळेवर हजर झालेला नव्हता. क्रीडा कार्यालयाकडून या उशिरा सहभागी होणाऱ्या शाळांची पाठराखण केल्यामुळे या शाळा व खेळाडू नेहमीच स्पर्धेला उशीर करीत असल्याचेही येथील काही सुत्रांनी सांगितले.मंगळवारी १४, १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या बॉक्सींग स्पर्धा पार पडल्या. यामध्ये सुमारे ७३ खेळाडू सहभागी झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धा सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होत्या. दिवसभर अन्न पाण्यावाचून हे खेळाडू स्पर्धेत खेळत होते. दुपारच्या वेळेसच जेवन केले असल्याचे एका खेळाडूने सांगितले.बुधवारी काय आढळले..बुधवारी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकूलातील बॅडमिंटन हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला. यावेळी काही खेळाडू सराव करीत होते. येथील काही संयोजकांना विचारले असता त्यांनी आणखी स्पर्धेला सुरू होण्यासाठी भरपूर वेळ असल्याचे सांगितले. ११ ला सुरू होणारी स्पर्धा दुपारी दोन पर्यंतही सुरूच झाली नव्हती, यावरून क्रीडा कार्यालयाचे स्पर्धेकडे किती दुर्लक्ष आहे, हे दिसून येते.‘मॅट’ सोडून दुसऱ्याच जागेवर घेतली स्पर्धाबॅडमिंटन हॉलमध्ये बॉक्सिंग स्पर्धेसाठी मंगळवारी मुलांना पायाखाली मॅट होती. बुधवारी मात्र ही मॅट चक्क कोपऱ्यात फेकून देण्यात आली होती व आलेल्या खेळाडूंना जमिनीवर (मऊ जागेत) खेळविल्यामुळे त्यांचे पाय घसरत होते. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्ध्याला मारताना अडचणी येत होत्या. अनेकांना यामुळे आपला पॉर्इंटही गमवावा लागला.नियमांचा अभावआलेल्या खेळाडूंना बॉक्सिंग स्पर्धेचे काय नियम असतात? याबाबत कुठलीही माहिती नसावी, असे त्यांच्या बोलण्यावरुन वागण्यावरुन दिसून येत होते. स्पर्धेच्या ठिकाणी ‘धिंगाणा’बुधवारी बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा सुरू असताना संयोजकांचा व क्रीडाप्रेमींचा मोठ्या प्रमाणात धिंगाणा सुरू होता. याला आळा बसविण्यासाठी कुठलाही सुरक्षा रक्षक येथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण होते. व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहातकाही दिवसापूर्वीच व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये क्रीडा अधिकाऱ्यांच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आल्याने खेळाडूंचे हाल झाले नव्हते.याबाबत क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ म्हणाल्या, स्पर्धेमध्ये खेळाडूंचा अपघात झाल्यास उपचाराचे साहित्य असणे आवश्यक आहे, तशा सूचनाही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत, त्यांनी याची काळजी घेतलेली नाही. मी स्वत: पाहणी केली असून, याच्यानंतर खेळाडूंचे कुठलेही हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. ढिसाळ नियोजनाची चुक मान्य आहे.