शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हातपाय बांधून रेल्वेरुळावर टाकलेल्या 'त्या' युवकाचा पाच मिनीटावर होता मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 19:20 IST

औरंगाबाद: उसणे पैसे परत मागवून एका २९ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकून दिले. परंतु, काही ...

ठळक मुद्दे भुतेकर व रवींद्र यांच्यात उधारीचे पैसे कधी देणार यावरून शाब्दीक वाद सुरु झाला. भुतेकर याने त्याच्या पोटात पाठीवर लाथाबुक्याने जोरदार मारहाण केली.नागरिकांनी दक्ष पोलिसांनी वाचविले प्राण

औरंगाबाद: उसणे पैसे परत मागवून एका २९ वर्षीय युवकाला जोरदार मारहाण करीत विष पाजून रेल्वेपटरीवर फेकून दिले. परंतु, काही दक्ष नागरिक व पोलिसांच्या सर्तकतेने या युवकाला तेथून बाजूला घेण्यात आले. याच वेळी रूळावरून पाच मिनीटाच्या अंतराने दोन रेल्वे धडधडत गेल्या. हि थरारक घटना बुधवारी रात्री घडली मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर घडली.

रविंद्र नाना दांडगे (२८, रा. चेतनानगर हर्सुल) असे त्या युवकाचे नाव असून त्याच्यावर घाटीच्या वॉर्ड क्रमांक ८ मध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, भोकरदन येथील काकोबा तळणीचा गोपाल प्रकाश भुतेकर याने मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळून फोन करुन रविंद्रला बोलवून घेतले. त्यावेळी भुतेकर व रवींद्र यांच्यात उधारीचे पैसे कधी देणार यावरून शाब्दीक वाद सुरु झाला. यावर रविंद्रने त्याला जानेवारीत पैसे देतो असे सांगीतले. परंतु; भुतेकर याने त्याच्या पोटात पाठीवर लाथाबुक्याने जोरदार मारहाण केली. यानंतर त्याचे हातपाय बांधून विषाची बॉटल तोंडात टाकली व त्याला विश्रांतीनगर परिसरातील रेल्वेपटरीलगत नेऊन टाकले.  

अन् रिक्षाचालक धावले मदतीला...रात्र झाल्याने रूळावर देखील काळोख होता, पायी जाणा-या एका युवकाला पटरीच्या बाजूला काही हालचाल दिसली. त्याने पुन्हा निरखुन पाहिले असता एक व्यक्ती अत्यवस्थेत पडलेला दिसून आला. त्याने आरडाओरड केल्याने काही रिक्षाचालक व नागरिकांनी रूळाकडे धाव घेतली. याचवेळी घटनेची माहिती पुंडलीकनगर पोलिसांना दिल्याने तेही घटनास्थळी धावून आले. 

गुरूवारी झाला गुन्हा दाखल प्रकृती अत्यवस्थ असल्याने नागरिकांनी रवींद्रला उपचारासाठी तात्काळ शासकीय दवाखान्यात दाखल केले. तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी देखील घाटीत गर्दी केली होती. यावेळी त्याची प्रकृती स्थिर नसल्याने पोलिसांना पूर्ण चौकशी करता आली नाही. यामुळे आज पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात जिवेमारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक मुदीराज करीत आहेत.