शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तातल्या आयफोनचा मोह पडला महागात; १८ हजार गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 15:37 IST

ई-बे या वेबसाईटवर आयफोन ६ एस अवघ्या १५ हजारात विक्रीस असल्याची जाहिरात पाहिली.

अंबाजोगाई : अवघ्या १५ हजार रुपयात आयफोन देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाई येथील तरुणाची फसवणूक झाल्याची घटना अंबाजोगाई शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिल्ली येथील एकावर गुन्हा नोंद करण्यात आला.   शहरातील आनंद नगर भागात राहणाऱ्या सागर अशोक मोहिते या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याने ई-बे या वेबसाईटवर आयफोन ६ एस अवघ्या १५ हजारात विक्रीस असल्याची जाहिरात पाहिली. त्याने वेबसाईटवरून विक्रेत्याचा मोबाईल क्रमांक घेऊन थेट त्याच्याशी संपर्क केला.  विक्रेत्याने सदर वेबसाईटवरील असलेली ही ऑफर बंद झाल्याचे सांगितले. तरीदेखील फोन पाहिजे असेल तर हायटेक सोल्युशन्स प्रा.लि. च्या पेटीएम वॉलेटमध्ये १५ हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यानुसार दि. २२ मे रोजी सागरने १५ हजार रुपये सदर कंपनीकडे जमा केले आणि त्यांना फोन लावला. त्यांनतर दोन दिवसात मोबाईल घरपोच मिळेल असे सांगण्यात आले. दि. २३ मे रोजी सागरला पुन्हा फोन आला आणि आणखी ३ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. सागरने नकार देताच त्यांनी ३ हजार जमा केले नाहीत तर आधीचे १५ हजार देखील परत मिळणार नाहीत असे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने सागरने आणखी ३ हजार रुपये हायटेक सोल्युशन्सकडे जमा केले. त्यानंतर आणखी अठराशे रुपये पाठव अशी सूचना सागराल करण्यात  आली. त्यामुळे फसवणुकीची शक्यता वाटल्याने सागरने त्यांच्याकडे फोटो आयडीची मागणी केली असता विक्रेत्याकडून त्याला पंकज राजकुमार शर्मा रा. नवी दिल्ली या नावाचे आधार कार्ड दाखविण्यात आले. पैसे आणि मोबाईल मिळण्याची खात्री न वाटल्याने अखेर सागरने पेटीएमकडे याबाबत तक्रार केली. यावर पेटीएमकडून त्यास पोलिसात जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर सागरने अंबाजोगाई पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पंकज राजकुमार शर्मा याच्यावर कलम ४१५, ४२०, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ गीते करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजी