शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

कुपोषणाने कोमेजली भावी पिढी !

By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड कुपोषण निमुर्लनासाठी कसोशीचे प्रयत्न होत असताना त्याचा अपेक्षित ‘रिझल्ट’ काही मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़

संजय तिपाले , बीडकुपोषण निमुर्लनासाठी कसोशीचे प्रयत्न होत असताना त्याचा अपेक्षित ‘रिझल्ट’ काही मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यातील सुमारे २१०३ बालके कुपोषित असल्याचे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केलेल्या तपासणीतून पुढे आले आहे़ कुपोषणात गेवराई तालुका सर्वात पुढे असून भावी पिढी कोमेजून गेली आहे़ त्यामुळे कुपोषणाच्या नावाखाली नेमके कोणाचे ‘पोषण’ होतेयं? याचे कोडे कायम आहे़१ एप्रिल २०१३ पासून केेंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कायक्रम राबविला जातो़ याअंतर्गत ० ते १८ वर्षेवयोगटातील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते़ जून महिन्यात केलेल्या तपासणी दरम्यान जिल्ह्यात २ हजार १०३ बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे़ अतितीव्र बालकांची संख्या ४५३ इतकी आहे तर १६५० बालके मध्यम तीव्र कुपोषित आहेत़ गेवराई तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालके आहेत़ या तालुक्यात अतितीव्र कुपोषित बालकांचा आकडा १६९ इतका असून १६८ बालके मध्यम तीव्र कुपोषित आहेत़ बालस्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून तालुकानिहाय पथकांमार्फत तपासणी केली जाते अशी माहिती राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे पर्यवेक्षक रमेश तांगडे यांनी दिलीे़ १३ जुलै रोजी बीड येथे बालकांच्या फाटलेल्या ओठांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्व तपासणी शिबीर आयोजित केले आहे़ त्यासाठी ३८ बालकांची नोंदणी झाली असून तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत, असेही तांगडे म्हणाले़तालुकाअतितीव्र मध्यमतीव्रबीड७६९५परळी१८०५अंबाजोगाई९५२६७माजलगाव२८७२गेवराई१६९८०५धारुर१२१२६आष्टी४५१८८केज३११६७पाटोदा३५६९वडवणी०५३२शिरुर११२८एकूण४५३१६५०९४हजार ८८९ बालके ० ते ३ वयोगटातील असून त्यापैकी २५२ बालके अतितीव्र कुपोषित आहेत़०१लाख १७ हजार ९५७ बलके ३ ते ६ वयोगटातील आहेत़ त्यापैकी २०१ बालके अतितीव्र आहेत़०२लाख १२ हजार ८४६ बालकांची आरोग्य तपासणी बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे़