शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आपले गाव आदर्श बनवा

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी जांभरून येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे, गावच्या सरपंच लहिजाबाई जुमडे, कळमनुरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धाबे, पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी आरोग्यसेवा, शिक्षण, घरकुल, रेशन, रोहयो या बाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. जांभरून हे गाव आदिवासीबहुल असल्या कारणाने आदिवासींच्या योजनांबाबतही काही ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी कासार म्हणाले की, ग्रामस्थांनी आरोग्याच्या बाबतीत सदैव सजग रहावे, महिलांसोबत बालकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास सदृढ पिढी निर्माण होईल, आरोग्य विषयक शासकीय उपक्रमांचा लाभ घ्यावा. उपचारासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. गरोदर महिलांनी आशा स्वयंसेविकांच्या संपर्कात रहावे, बालकांना वेळेवर लसीकरण करावे, मुलींचे लग्न १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर करावे. ते म्हणाले की, उघड्यावर शौचास बसू नका, शासनाच्या योजनेचा लाभ घेवून घरोघरी शौचालय बांधा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेवून शेततळी, विहिरी यासह जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवा, आधुनिक पद्धतीने शेती करा, जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा, यावेळी वारसांची नावे लावण्याबाबतची कार्यवाही तातडीने पुर्ण करून चावडी वाचन करण्याबाबतची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मुलांना शाळेत घाला. त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांनी महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा, रेशनच्या धान्याचा पुरवठा व्यवस्थित होतो काय? यासाठी ग्रामदक्षता समितीने दक्ष रहावे, ग्रामस्थांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जावू नये, गावाच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना समजून घ्या, अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. काही ग्रामस्थांना वन विभागाच्या वतीने गॅस किटचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)