शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये वाळू माफियांवर मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनी १६ ट्रकसह ५ जेसीबी, सक्क्षण पंप केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 22:48 IST

Sand Mafia Crime News महसूल विभागाच्या बुधवारच्या कारवाईने वाळू माफियांवर सक्रांतच आली आहे.

ठळक मुद्देनांदेड तालुक्यातील बोंढार येथे गोदावरी नदी पात्रात धाड थुगाव आणि पिंपळगाव कोरका येथेही अवैध उपस्यावर कारवाई

नांदेड : जिल्ह्यात महसूल यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीच्या लगबगीत असताना नांदेड तालुक्यात खुलेआम वाळू उपसा करणाऱ्यांवर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कारवाई करीत तब्बल १६ ट्रक, ५ जेसीबी मशीन यासह वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारा एक सक्क्षण पंपही जप्त केला आहे. महसूल विभागाच्या बुधवारच्या कारवाईने वाळू माफियांवर सक्रांतच आली आहे.

नांदेड तालुक्यातील बोंढार येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि माती चोरी केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर नांदेड तहसीलचे नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांचे पथक तेथे पाठविण्यात आले. महसूलच्या पथकाला पाहताच वाळू माफिया आणि माती चोरटे वाहने सोडून पळून गेले. यावेळी या पथकाने तब्बल १५ ट्रक आणि ३ जेसीबी जप्त केले. याठिकाणी पोलीस पथकासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारीही दाखल झाले.

या कारवाईदरम्यानच जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना नांदेड तालुक्यातीलच थुगाव आणि पिंपळगाव कोरका येथेही अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. उपविभागीय अधिकारी डॉ. लतीफ पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी गोदावरी पात्रात पोहोचले. तेथे थुगाव येथे वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारी जेसीबी, १ ट्रक आणि १ सक्क्षण पंपही जप्त करण्यात आला. पिंपळगाव कोरका येथेही एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती. या कारवाईत मंडळ अधिकारी अनिरूध्द जोंधळे, तलाठी सचिन नरवाडे, सय्यद मोहसीन, उमाकांत भांगे, आकाश कांबळे, नारायण गाडे आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात वाळू माफियांवरील कारवाईत खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर हे सरसावले आहेत. एकीकडे जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने सुरू असताना वाळू माफियांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ऐन संक्रातीच्या आदल्या दिवशी ही कारवाई वाळू माफियांवर संक्रात आणणारीच ठरली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहिल असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड