शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात डॉक्टरांच्या राजकारणामुळे रुग्ण त्रस्त

By admin | Updated: June 11, 2017 00:41 IST

माजलगाव : दोन दिवसांसाठी रूग्णालयाचा कारभार घेतला आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षे रूग्णालयाचे कारभारी बनून राहले

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : दोन दिवसांसाठी रूग्णालयाचा कारभार घेतला आणि राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने दोन वर्षे रूग्णालयाचे कारभारी बनून राहले. नुसते थांबलेच नाहीत तर राजकारण सुरू केले. डॉक्टरांचे हे राजकारण रूग्णांसाठी धोकादायक ठरू पाहत होते. या राजकारणापायी रूग्णांचे हाल होत आहेत. यातच शुक्रवारी दुपारी डॉ. यशवंत राजेभोसले यांच्यावरील हल्ल्यात ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांचाच हात असल्याचे राजेभोसले यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनेक वर्षे माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदावर राहिल्यानंतर बदली होऊनही राजकीय वरदहस्ताने केज येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे माजलगाव ग्रामीण रूग्णालयाचा पदभार देण्यात आला. दोन दिवसांच्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ.साबळे यांनी दोन वर्षानंतरही पदभार सोडलेला नाही. डॉ.राजेभोसले यांच्या मारहाण प्रकरणात त्यांचे नाव आल्याने शनिवारी जवळपास सर्वच रूग्णालय बंद ठेऊन निषेध नोंदविण्यात आला. याचा फटका सर्वसाामन्य रूग्णांना सहन करावा लागला.डॉ.सुरेश साबळे यांची अनेक वेळा बदली झाली. परंतु त्यांनी वरिष्ठांवर राजकीय दबाव आणून बदली रद्द करून घेतली. तीन वर्षापूर्वी केज येथे बदली झाली होती. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती होती. परंतु त्यांनी दोन वर्षापूर्वी राजकीय दबावापोटी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्रतिनियुक्ती करून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक पदाचा पदभार घेतला होता. दोन दिवसासाठी प्रतिनियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना असतांना देखील डॉ. साबळे हे मागील दोन वर्षापासून माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हाकत आहेत.दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने सर्व रुग्णालयांच्या तपासण्या करून त्यामध्ये काही त्रुटी असल्यास याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते. या दरम्यान डॉ.सुरेश साबळे यांनी डॉक्टरांना त्रास देत त्यांना ‘टार्गेट’ केल्याचा आरोप जाहीरपणे केला होता. एप्रिल महिन्यात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या डॉक्टरांची बैठक झाली होती. यामध्ये डॉ.साबळे यांनी बीएचएमएस असलेल्या डॉक्टरांकडे जाऊ नये, असे नियम काढल्याने डॉ. यशवंत राजेभोसले व काही डॉक्टरांनी याला विरोध केला होता. आपल्याला डॉक्टरांनी विरोध केल्याचा राग मनात धरूनच डॉ.साबळे यांनी गुंडाकडून माझ्यावर हल्ला केला असल्याचा आरोप डॉ. राजेभोसले यांनी केला.