शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:05 IST

दासखेड येथील मतिमंद विद्यालयातील अठरा वर्षीय कर्णबधिर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : तालुक्यातील दासखेड येथील मतिमंद विद्यालयातील अठरा वर्षीय कर्णबधिर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्याचे शव ग्रामीण रूग्णालयात आणले. विद्यार्थीयाच्या पालकास दुपारी एक वाजता पाल्य आजारी असल्याचे कळवण्यात आले. पोलिसात मात्र सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती. शवविच्छेदन न करताच शव घेऊन जाण्याची प्रक्रि या सुरू होती. वरिष्ठ पोलिस अधिकाºयांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर स्थानिक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.गणेश दिनकर घाडगे (१८ रा.वाकनाथपूर ता.जि.बीड) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. गणेश हा मुकबधिर होता. तीन महिन्यापूर्वी त्यास दासखेड येथील कै. अप्पासाहेब मुसळे मतीमंद विद्यालयात प्रवेश दिला होता. बुधवारी सकाळी ११ वाजण्याचे सुमारास मतिमंद विद्यालयातील कर्मचारी गणेश याचे शव घेऊन ग्रामीण रूग्णालयात पोचले. रूग्णालयात कार्यरत डॉ. संकेत बाहेती यांनी पाटोदा पोलीस आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.नारायण गाडे यांना माहिती दिली. त्यांनी शवविच्छेदनासाठी नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.गणेश गुंड यांना कळवले. गुंड रूग्णालयात बारा वाजता पोचले. मात्र, पोलीस कार्यवाही काहीच झालेली नसल्याने त्यांनी शवविच्छेदन केले नाही.नायगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश गुंड यांचा संपर्क न झाल्याने मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकले नाही.शाळेचे अधीक्षक भागवत नवले यांनी गणेशचे वडील दिनकर घाडगे यांना मुलगा आजारी असल्याची माहिती दुपारी एक वाजता कळवली. पालक आणि नातेवाईक रूग्णालयात पोहोचल्यावर शाळेतील कर्मचाºयांनी त्यांच्याशी ‘चर्चा’ केली. पालकांनी मृतदेह शवचिकित्सा व पोलिसात नोंद न करताच घेऊन जाण्याची तयारी केली.४सायंकाळच्या सुमारास माध्यमांनी रूग्णालयात धाव घेत हा प्रकार समोर आणला. या प्रकरणात ‘गडबड’ असल्याचा संशय आल्याने आणि स्थानिक पोलिस कायदेशीर कार्यवाही करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अभिजित पाटील यांच्यापर्यंत गेले.४ पाटील यांनी स्थानिक पोलिसांना खडसावल्यानंतर आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. दरम्यान, या सर्व घटनाक्रमामुळे गणेशच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. रूग्णालय परिसरात चर्चेला उधाण आले होते.