शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शेरखान यांचा खून करणारा मुख्य आरोपी अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:02 IST

हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणा-या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणा-या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना रविवारी रात्री यश आले.शेख सरताज शेख नासेर ऊर्फ अज्जीदादा (२५, रा. युनूस कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. शेरखान यांच्या खूनप्रकरणी आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या ९ झाली आहे. याप्रकरणी मुन्ना बोचरा हा पसार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी, हॉटेल व्यावसायिक शेरखान यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. २७ डिसेंबरच्या रात्री झालेल्या या खुनाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहेत. पूर्व वैमनस्यातून आणि प्लॉटिंगच्या वादातून शेरखान यांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सुपारी देणाºया अक्रम खानसह आरोपी शेख अश्फाक, आकाश पडूळ ऊर्फ शेरा यांना २ मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. या आरोपींचे पसार असलेले साथीदार शेख सरताज आणि मुन्ना बोचरा यांचा शोध पोलीस घेत होते. रविवारी रात्री सरताज हा घरी आल्याची माहिती खब-याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक नसीम खान, कर्मचारी सुरेश काळवणे, समद पठाण, रमेश भालेराव, प्रदीप शिंदे, भाऊसिंग चव्हाण, संदीप बीडकर यांनी रात्रीच आरोपीच्या घरावर धाड मारून त्यास पकडले. सरताज आणि अन्य आरोपींनी शेरखान यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा खून केला होता. शेरखान हे वादग्रस्त प्लॉटस् आणि जमीन खरेदी-विक्र ी आणि हॉटेलचा व्यवसाय करीत. जमीन व्यवहारात त्यांचे अनेकांशी वाद झाले होते. शिवाय शेरखान याच्या विरोधातही विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे पोलिसांत दाखल होते.आणखी एकास पोलीस कोठडीछावणीतील शेरखान यांच्या खून खटल्यात पोलिसांनी अटक केलेला आणखी एक आरोपी शेख सरताज ऊर्फ अज्जीदादा शेख नसीर (२५), रा. युनूस कॉलनी, कटकटगेट याला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सोमवारी (दि.५ मार्च) दिले.दरम्यान, रविवारी अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. अक्रमखान गयाज खान (२७, रा. जटवाडा), शेख अश्फाक शेख इसाक (२५, रा. शहाबाजार) आणि आकाश पडूळ ऊर्फ शे-या (२२, रा. जिन्सी परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.