करमाड : औरंगाबाद तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी शुक्रवारी आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षण पदासाठी वापरण्यात आलेली प्रक्रिया जुनीच असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी नव्याने चिठ्ठी काढण्यात आली.
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आलेल्या सोडतीपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे २३ जागांचे आरक्षण कायम ठेवण्यात येऊन उर्वरित ९१ जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवून आरक्षण कायम करण्यात आले. तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या शरणापूर, पंढरपूर, तिसगाव या मोठया ग्रामपंचायतीवर आता महिलाराज पाहायला मिळणार आहे. प्रतीक्षा साईनाथ पचलोरे या बालिकेच्याहस्ते डब्यांमधून सर्वांसमक्ष चिठ्ठ्या काढण्यात आल्या. समोरचा हॉल खचाखच भरलेला होता, तर व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीलदार प्रभाकर मुंडे, रेवनाथ ताठे, सचिन वाघ आदींची उपस्थिती होती.
सरपंच आरक्षण सोडत
अनुसूचित जातीसाठी २० व अनुसूचित जमातीस ३ अशा एकूण २३ जागांसाठी ८ डिसेंबर २०२० रोजी काढण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित ९१ जागांसाठी काढण्यात आलेले आरक्षण खालीलप्रमाणे :
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
जटवाडा, गोलटगाव, गारखेडा, वंजारवाडी, लिंगदरी, वळदगाव, वडगाव कोल्हाटी, पिंपळखुटा, टोणगाव, कुंभेफळ, ओव्हर, मंगरूळ, पांढरी पिंपळगाव, चिंचोली, झाल्टा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिला)
शरणापूर, आडगाव सरक, शेंद्राबन, गिरनेरा,खोडेगाव, सांजखेडा, माळीवाडा, देमणी, पाचोड, निपाणी, पंढरपूर, गोलवाडी, नायगव्हाण, भिंदोन, भालगाव, तिसगाव.
सर्वसाधारण (३० जागा)
घारदोन, वरझडी, दौलताबाद, करमाड, भांबर्डा, पोखरी, मांडकी, कोनवाडी, सिंदोन, महालपिंप्री, वरूड, वडखा, गेवराई कुबेर, सताळा, कोळघर, सावंगी, डायगव्हाण, पिंपळगाव पांढरी, मोरहिरा, शिवगड तांडा, घारेगाव एकतुणी, अब्दीमंडी, पिसादेवी, कौडगाव जालना, आडगाव माहोली, अंजनडोह, वाहेगाव, परदरी, काद्राबाद, गांधेली.
सर्वसाधारण - महिला राखीव (३० जागा)
शेलुद, चारठा, मुरूमखेडा, चित्ते पिंपळगाव, पिरवाडी, लायगाव, जडगाव, सटाणा, खामखेडा, एकोड, गेवराई ब्रुकबॉण्ड, बनगाव, काऱ्होळ, शेवगा, लाडगाव, दुधड, रावसपुरा, चितेगाव, जळगाव फेरण, शेंद्रा कमंगर, राहाळपटटी तांडा, गाडे जळगाव, शेकटा, ढवळापुरी, करोडी, जोडवाडी, पिंप्री खु, बाळापूर, घारेगाव पिंप्री, कृष्णपूरवाडी.
कॅप्शन -
सरपंच पदाच्या आरक्षणाची चिठ्ठी काढताना प्रतीक्षा साईनाथ पचलोरे, तर बाजूला उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार शंकर लाड, नायब तहसीदार प्रभाकर मुंडे, रेवनाथ ताठे.