शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीला २ वर्षांत विजयाच्या हॅट्रिकची संधी; लोकसभा व विधानसभेचा फड महायुतीने गाजविला अन् जिंकलाही 

By शांतीलाल गायकवाड | Updated: December 18, 2025 10:07 IST

शिवसेनेला आपला खुंटा हलवून पक्का करण्याची संधी; काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र लढल्यास चित्र वेगळे

शांतीलाल गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेपाठोपाठ विधानसभेचे मैदान मारलेल्या महायुतीला महानगरपालिकेचा फड जिंकून विजयाची हॅटट्रिक मारण्याची सुवर्णसंधी आहे. मुळात हे शहर अखंडित शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच नावलौकिकाला गेलेला होता. शिवसेनेतून फुटून निघालेल्या शिंदेसेनेने लोकसभा व विधानसभेत भरभक्कम विजय नोंदवून हा लौकिक राखला आहे.

शहरात सध्या शिंदेसेनेचे दोन व भाजपाचेही दोन आमदार आहेत. त्यातही शिंदेसेना व भाजपाने एकएक कॅबिनेट मंत्रिपदही शहराला दिले आहे. शिवाय दोन खासदारही दिमतीला आहेत. त्यातही महायुती एकत्रित लढण्याची शक्यताच अधिक दिसते. त्यामुळे महायुतीचे पारडे जड दिसते. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील अनेक शिलेदार अगोदरच महायुतीच्या कोणत्या ना कोणत्या पक्षात डेरे दाखल आहेत. महाआघाडी होईल की नाही? वंचित बहुजन आघाडीसोबत असेल का? आदी अनेक मुद्दे अद्यापही प्रलंबित आहेत.

एकूण प्रभाग किती आहेत? - २९एकूण सदस्य संख्या किती? - ११५

पाच वर्षांचे प्रशासक राज आता संपणार

एप्रिल २०२० मध्ये सभागृहाची मुदत संपली व सभागृह विसर्जित करण्यात आले. तेव्हापासून या महापालिकेवर प्रशासक राज आहे. अस्तिककुमार पांडे हे पहिले प्रशासक होते. त्यानंतर डॉ. अभिजित चौधरी आले. सध्या जी. श्रीकांत ही भूमिका निभावत आहेत.

हे मुद्दे निर्णायक ठरतील?

१. मतदार यादीतील घोळ हा निवडणुकीचा सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा ठरला आहे. गेल्या महिन्यात ७,००० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. याबाबत जनतेतूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.२. शहरातील अनियमित व अपुरा पाणीपुरवठा हा कायमचा ज्वलंत मुद्दा असून, प्रशासक राजवटीतही तो सुटला नाही. नागरिकांना आठ दिवसांआड तास-दीड तासच पाणी मिळते आहे.३. निवडणूक आधी काही महिने दहा प्रमुख रस्त्यांवर पाडापाडी केली असली तरी धूळ, सांडपाणी, खड्डे आणि कचरा कोंडीच्या समस्या कायम आहेत.४. पाच वर्षे प्रशासकांनी कर वसुली वाढवली, कोविड हाताळणी चांगली केली व स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती दिली. मात्र, भ्रष्टाचाराच्या तक्रारी, नेत्यांशी संघर्षामुळे टीका होत आहे.

२०१५ मध्ये महापालिका निवडणुकीतील मतदार

एकूण मतदार - ६, ८९,३९२पुरुष मतदार - ३,६६,३८२महिला मतदार - ३,२३,०१०इतर - ००० 

२०१५ मध्ये झालेले मतदान

पुरुषांनी - २,१८,१८२आणि महिलांनी - १,८३,१३६एकूण मतदान - ४,०१,३१८५८.२१ टक्के मतदान झाले होते.

आता एकूण किती मतदार ?

एकूण - ११,१८,२८३पुरुष - ५,७४,९३०महिला - ५,४३,२६८इतर - ८५

पक्षीय जागावाटप आणि स्पर्धाः ११३ जागांपैकी ५८ महिलांसाठी, ३१ ओबीसी, २२ एससी आणि २ एसटीसाठी आरक्षित आहेत. त्यावरून जागावाटप वाद वाढेल. गेल्या निवडणुकीत शिवसेना (२९), एआयएमआयएम (२५), भाजप (२२) आघाडीवर; आता महायुतीत फूट आणि १,४४० उमेदवार अर्ज दाखल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची स्पर्धा तीव्र असेल.

वाढलेले मतदार ठरणार निर्णायक 

महापालिका १० वर्षांत हद्दीत ३ लाख ९८ हजार मतदार वाढले. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदारांचा कौल महायुतीच्या पारड्यात गेल्याचे दिसते. महापालिकेच्या निवडणुकीतही हे वाढलेले मतदार निर्णायक ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Grand Alliance eyes hat-trick win in local Aurangabad elections.

Web Summary : After Lok Sabha and Assembly victories, the Grand Alliance aims for a hat-trick in the Aurangabad Municipal Corporation elections. Increased voter turnout favors the alliance. Key issues include water supply and voter list discrepancies. The election will see a tough fight between the Grand Alliance and Maha Vikas Aghadi.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकChhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६