शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

महावितरणचीही अवकाळी

By admin | Updated: April 14, 2015 00:34 IST

राजेश खराडे , बीड गतवर्षी अवकाळी पाऊसात पडलेल्या कामाचे बील अद्याप न मिळाले नाही. त्यामुळे महावितरणचे कंत्राटदार यावर्षी पोल दुरुस्तीचे काम हातात घेण्यास नकार देत आहेत

राजेश खराडे , बीडगतवर्षी अवकाळी पाऊसात पडलेल्या कामाचे बील अद्याप न मिळाले नाही. त्यामुळे महावितरणचे कंत्राटदार यावर्षी पोल दुरुस्तीचे काम हातात घेण्यास नकार देत आहेत तर गेल्या वर्षी आॅडर दिलेली कामे बोगस असल्याचा ठपका ठेवत त्यांची बील दिली नाहीत. या वादात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे झालेल्या विद्युत पोलची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी सहा उपकेंद्रच बंद असल्याने जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्या महिनाभरापसून अंधरात आहेत. महावितरण कंपनीकडून दुरूस्तीकरिता कोणतेही उद्यापर्यंत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महावितरणच्या या अजब कारभारामुळे जिल्ह्याततील संतप्त विद्युत ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.महिन्याभरापसापसून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. १ मार्च पासून आतापर्यंत ११०० विद्युत खांब उनमळून पडले आहेत. यामध्ये प्रमुख वाहीनीवरील ४५५ तर लघुदाब वाहिनीवरील ६४३ विद्युत खांबाची पडझड झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील सर्वाधिक मुख्य प्रवाहावरील ३४ तर लघुदाब वाहिनीवरील ७८ वाड्या-वस्त्यावरील पोलची नासधुस झाली आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही महावितरण कंपनीने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. महिन्याभरापसून महावितरणची पडझड झाली असूनही कंत्राटदारांना मात्र दुरूस्तीविषयी अद्यापही आॅर्डर देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आष्टी तालुक्यातील लाटेवाडी, महाजनवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील विद्युत पुरवठा तब्बल महिन्याभरापासून खंडित आहे.जनजीवन विस्कळीत अवकाळीने थैमान घातल्याने सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्यातच ग्रामीण भागात महावितरणचे पोल घरावर पडले आहेत तर ट्रान्सफर्मर उघडे असल्याने ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. महावितरणमध्ये गुफ्तगुया पुर्वीच्या काळात कंत्राटरांना परिमंडळाच्या परवानगीविनाच टेंडर दिले होते. त्यामुळे यंदाच्या दुरूस्ती कामाकरिता परिमंडळाकडून काम वाटपाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. या कारभारामुळेच कंत्राटदारांच्या कामावर अंकुश लावला असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजले आहे. सहा उपकेंद्र बंद अवस्थेत अवकाळीच्या अवकृपेने जिल्ह्यातील तब्बल सहा उपकेंद्र बंद अवस्थेत आहेत. यामध्ये वडवणी तालुक्यातील वडवणी, चिंचवण, देवडी, चिंचाळा तर परळी तालुक्यातील मोहा व आचार्य टाकळी या उपकेंद्रचा समावेश आहे. उपकेंद्र बंद असल्याने ५० गावांमध्ये अंधार असून तब्बल १० हजार ग्राहक विजेपासून वंचित आहेत. तर ३० डी.पी उन्मळून पडले आहेत. महावितरणला ७० लाखाचा फटकामार्च महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळीमुळे महावितरणला आता पर्यंत ७० लाखाचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान विद्युत खांबाचे आहे. तर नुकसानीबरोबर ग्राहाकनांही सेवा विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागात जागोजागी विद्युत वाहक तारा तुटलेल्या आहेत. महावितरणकडून पर्यायी व्यवस्था म्हणून ३३ केव्ही व ११ केव्ही केंद्रांतून विद्युत पुरवठा करण्याचा मार्ग महावितरणने निवडला आहे.