शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रासाठी महावितरणपुढे ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.मागील अनेक महिन्यांपासून रोहित्र दुरूस्ती व बदलून दिले जात नसल्याने ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. तसेच गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून वीजेमुळे व्यत्यय निर्माण होत आहे. महावितरणचे संबधित कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करीत असून कार्यालयाच्या शेतकºयांना चकरा माराव्या लागत आहेत. महावितरणच्या अधिकाºयांना वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांतून सांगितले जात होते. बिलभरणा करूनही रोहित्र बदलून अथवा दुरूस्ती करून दिले जात नाही. २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरातील शेतकरी व ग्रामस्थ रोहित्रांसाठी हिंगोली येथील महाविरण कार्यालयात आले होते. वसमत तालुक्यातील महागाव, सोमठाणा, कुरूंदा, टाकळगाव, सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथील ग्रामस्थ रोहित्रांच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. तर काही ठिकाणच्या डीपी वीज पडून जळून खाक झाल्या आहेत. वीज पडून जळालेल्या रोहित्रांचाही प्रश्न गंभीर असून तेही अद्याप बदलून दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.