शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण, कन्नड सुपरकिंग संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:57 IST

महावितरण संघाने यजमान एमजीएम संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने आमेर क्रिकेट क्लबवर १ धावाने निसटता विजय मिळविला.

ठळक मुद्देऋषिकेश सोनवणे, शुभम हरकळ सामनावीर किताबाचे मानकरी

औरंगाबाद : महावितरण संघाने यजमान एमजीएम संघावर ५ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने आमेर क्रिकेट क्लबवर १ धावाने निसटता विजय मिळविला.एमजीएम ट्विेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात महावितरण संघाविरुद्ध एमजीएम संघाने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकांत सर्वबाद ८५ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार गिरीश गाडेकरने एकाकी झुंज देताना २ चौकारांसह २५ व सागर शेवाळेने १० धावा केल्या. महावितरणकडून इनायत अली याने १२ धावांत ३ तर व्यंकटेश सोनवलकरने १० धावांत ३ बळी घेतले. शहीद सिद्दीकीने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरण संघाने विजयी टार्गेट १४.४ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ऋषिकेश सोनवणे याने ५ चौकारांसह ३५ व निशीत कंडी याने २१ धावा केल्या. एमजीएमकडून रहीम खानने ९ धावांत ३ बळी घेतले. अनंत बकाल व सागर शेवाळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुपारच्या सत्रात झालेल्या लढतीत कन्नड सुपरकिंगने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११४ धावा केल्या. त्यांच्याकडून शुभम हरकळने ५४ व सलमान अहमदने २८ धावा केल्या. आमेर क्रिकेट क्लबकडून अब्दुल सामीने ११ धावांत ४ गडी बाद केले. ताहेरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आमेर क्रिकेट क्लब ८ बाद ११३ धावांच करू शकला. त्यांच्याकडून कौसीन कादरीने ५७ चेंडूंत ६७ धावा केल्या. नौशाद हाश्मी व खालेद कादरी यांनी प्रत्येकी ११ धावा केल्या. कन्नड सुपरकिंगकडून भावेश पटेलने २० धावांत ३ गडी बाद केले. सलमान अहमद, आशिष मोरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आज झालेल्या सामन्यात अंकुर देशपांडे, गंगाधर शेवाळे व राजकुमार कंगले यांनी पंचांची कामगिरी केली. गुणलेखन राजकुमार तेवर याने केले. उद्या, सोमवारी सकाळी ८.१५ वाजता अश्वमेध क्रिकेट क्लब वि. यंग इलेव्हन ‘ब’ व दुपारी १२.३० वाजता कन्नड सुपरकिंग वि. अलॉफ्ट लायमर यांच्यात लढती होणार आहेत.