शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण गाफील; दिवाळी अंधारात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:05 IST

महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे दिवाळीसारखा सण पणतीच्या उजेडात साजरा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. दिवाळीत अंधार राहणार नाही, या दृष्टिकोनातून महावितरणकडून कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे दिवाळीसारखा सण पणतीच्या उजेडात साजरा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. दिवाळीत अंधार राहणार नाही, या दृष्टिकोनातून महावितरणकडून कसल्याच उपाययोजना केल्या नसल्याचे समोर आले आहे. महावितरणच्या गाफील कारभारामुळे सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून सर्व रोहित्रांची पहाणी करुन त्याची दुरुस्ती केली जाते. यासाठी साहित्यांची ज्या त्या कार्यालयाकडून मागणी केली जाते. मात्र, या वेळी दिवाळी हा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाही महावितरणकडून यासंदर्भात कारवाई केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.दिवाळी हा सण प्रत्येकाच्या घरी आनंद घेऊन येतो. घरावर व परिसरात विद्युत रोषणाई करुन परिसर उजळतो. यामुळे वातावरण प्रसन्न होते. परंतु या वेळेस सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे. उप कार्यकारी अभियंत्यांकडून केवळ ‘वसुली’ला प्राधान्य दिले जात आहे. परंतु ग्राहकांना सुविधा देण्यात मात्र ते अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.दिवसेंदिवस महावितरणचा बेजबाबदार कारभार वाढतच चालला आहे. वरिष्ठांचे दुर्लक्षच ग्राहकांना त्रासदायक ठरण्यास कारणीभूत ठरत असल्याचेही बोलले जात आहे. जे अधिकारी आणि कर्मचारी कामचुकारपणा करतात, ग्राहकांना वेठीस धरतात परंतु त्यांना सुविधा देत नाहीत अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे, त्यांची बाजू समजू शकली नाही.