जालना : शहरासह जिल्ह्यात भगवान महावीर जयंती अपूर्व उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. सकल जैन समाजाच्या वतीने शहरात श्री भगवान महावीर जन्मकल्याणकाचे आयोजन सकल जैन समाजामार्फत करण्यात आले होते. प. पू. आचार्य १०८ श्री सच्चीदानंद महाराजांचा संघ व कर्नाटक गजकेसरी प. पू. गुरुदेव श्री गणेशलालजी म. सा. आणि दक्षिण शासन प्रभावक प.पू. मिश्रीलालजी म. सा. चे सुशिष्य व ध्यानयोगी श्रमणसंघीय आचार्य सम्राट प. पू. शिवमुनिजी म. सा. च्या आज्ञानुवर्ती तेलातप आराधक प.पू. विवेकमुनिजी म. सा. आदि ठाणा ३ आणि विदर्भ सिंहनी प.पू. मानकुंवरजी म. सा., महाराष्ट्र प्रवर्तनी प. पू. प्रभाकवरजी म. सा. च्या सुशिष्या जैन सिध्दांतचार्य प. पू. प्रमोदसुधाजी म. सा. आदि ठाणा ४ आणि प. पू. उज्वलकुमार म. सा. आदि ठाणा ४ आणि प. पू. सुशिलाजी म. सा. आदी ठाणा २, प. पू. विजयश्रीजी म. सा, आचार्य प. पू. सुशिलमुनिजी म. सा.च्या सुशिष्या साध्वीश्री दिप्तीजी व साध्वीश्री लक्षिताजी म. सा. या जैन गुरुंचे पावन सानिध्य प्राप्त झाले.श्री भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त सकाळी ८.३१ वा. महावीर चौक येथे सकल जैन संघाचे आगमन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भगवान महावीर यांच्या शोभायात्रेस प्रारंभ झाला. सदर शोभायात्रेत शेकडो भाविकांची उपस्थिती होती. जालना शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण करीत मिरवणूक गुरुगणेशनगरातील तपोधाम येथे मिरवणुकीचा समारोप झाला. सदर मिरवणुकीमध्ये भगवान महावीर यांची पालखी, रथ, वाद्यवृंदाचा समावेश होता. मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. तसेच भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. दात्यांचा या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला.शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी सुदेश सकलेचा, स्वरुपचंद ललवाणी, डालचंद बोथरा, कचरुलाल कुंकूलोळ, महावीर धारीवाल, उत्तमचंद बनवट, मनोज मोदी, प्रमोद देसरडा, अशोक बिनायकिया, गौतमचंद मुणोत, विजय जैन, प्रेमचंद कासलीवाल, प्रवीण पहाडे, शिखर लोहाडे, रमेशचंद चौविश्या, संतोष बडजाते, पवन सेठिया, जिनदास वायकोस, चैतन्य वायकोस, सुभाष वायकोस, अशोक लव्हाडे, माणिकचंद कासलीवाल, सुरेश मरलेचा, संजय लव्हाडे, महावीर रुणवाल, सोमेश ठोल, योगेश पाटणी, अनिल छाबडा, सुधीर पहाडे, विजय सावजी, विजयराज सुराणा, आकाश बोथरा, अजय बोरा, रवींद्र संचेती, गौतम संचेती, चेतन बोथरा, ललित कर्णावट, नीलेश कुंकूलोळ, दर्शन पारख व समाज बांधवांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
महावीर जयंती उत्साहात
By admin | Updated: April 9, 2017 23:29 IST