शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत ...

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत झाला. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडण्याच्या धोरणानुसार औरंगाबाद विभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्व मदत करणार आहेत.

या धोरणामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले. काही इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली होती; परंतु आता महाविकास आघाडीचा निर्णय झाल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. सोबत काँग्रेस आणि शिवसेना आहे. इतर जागांबाबत देखील असाच फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिले; परंतु यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या सूचना -

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार आहे.

गायकवाड यांच्यासह सहा जणांचे अर्ज दाखल

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सहा उमेदवारांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात अर्ज दाखल केले. आजवर ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी डमी अर्ज दाखल केला. ते १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर आ. सतीश चव्हाण हेदेखील १२ रोजीच अर्ज दाखल करणार आहेत. उद्या बीडचे भाजपाचे माजी जिल्हाप्रमुख रमेश पोफळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. जयसिंगराव गायकवाड (अपक्ष) औरंगाबाद, आशिष देशमुख (अपक्ष, ता. जि. बीड), प्रवीणकुमार पोटभरे (अपक्ष, बीड), भारत फुलारे (अपक्ष, औरंगाबाद), अ‍ॅड. डॉ. यशवंत कसबे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी परभणी, शिरीष बोराळकर, भाजप औरंगाबाद यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली.