शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

निखिल नाईकच्या स्फोटक फलंदाजीने महाराष्ट्राचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:16 IST

यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक याने प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर महाराष्ट्राने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 लीगच्या सामन्यात गुजरात संघावर तीन चेंडू आणि चार विकेट राखून विजय मिळवला.

ठळक मुद्देसय्यद मुश्ताक अली करंडक : गुजरातवर ४ विकेटस्ने मात

राजकोट : यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईक याने प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या चौफेर टोलेबाजीच्या बळावर महाराष्ट्राने आज येथे पश्चिम विभागीय सय्यद मुश्ताक अली टी २0 लीगच्या सामन्यात गुजरात संघावर तीन चेंडू आणि चार विकेट राखून विजय मिळवला.एससीए स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गुजरात संघाने ८ बाद १५१ धावा केल्या. हे लक्ष्य महाराष्ट्राने १९.३ षटकांत ६ गडी गमावून १५४ धावा करीत गाठले. गुजरातकडून कर्णधार अक्षर पटेलने ३८ धावा केल्या आणि चिराग गांधी याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ५७ धावांची भागीदारी केली. चिराग गांधीने ३७ चेंडूंत एक षटकार, ६ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. हे दोघे खेळपट्टीवर येण्याआधी गुजरातचा अर्धा संघ ४५ धावांत तंबूत परतला होता. महाराष्ट्राकडून डोमेनिक मुथ्थुस्वामीने २७ धावांत ४ गडी बाद केले. श्रीकांत मुंडे, नौशाद शेख आणि समद फल्लाह यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात महाराष्ट्राचीही स्थिती बिकट झाली होती आणि त्यांनी ७.५ षटकांतच आघाडीचे ऋतुराज गायकवाड (२६), कर्णधार राहुल त्रिपाठी (७), अंकित बावणे (१), नौशाद शेख (४) यांना गमावले होते; परंतु निखिल नाईक याने तडाखेबंद फलंदाजी करताना प्रयाग भाटी याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी ४९ आणि दिव्यांग हिंगणेकर याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ४३ धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याने अष्टपैलू श्रीकांत मुंडेच्या साथीने महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. निखिल नाईकने ३७ चेंडूंतच ६ चौकार आणि २ टोलेजंग षटकारांसह ७0 धावांची वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने २६, प्रयाग भाटीने २३ व हिंगणेकर याने १५ धावा केल्या. गुजरातकडून अनुभवी लेगस्पिनर पीयूष चावला याने २७ धावांत ३ गडी बाद केले. या विजयाने महाराष्ट्राला ४ गुण मिळाले आहेत.संक्षिप्त धावफलकगुजरात : २0 षटकांत ८ बाद १५१. (चिराग गांधी ६१, अक्षर पटेल ३८. डोमेनिक मुथ्थुस्वामी ४/२७, श्रीकांत मुडे १/३६, समद फल्लाह १/३२).महाराष्ट्र : १९.३ षटकांत ६ बाद १५४. (निखिल नाईक नाबाद ७0)