शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा संघ अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:30 IST

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित अखिल भारतीय टी २0 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज झालेल्या उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशचा ३५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राची विजेतेपदाची गाठ उद्या राजस्थान संघाविरुद्ध पडणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित अखिल भारतीय टी २0 दिव्यांग चषक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने आज झालेल्या उपांत्य फेरीत आंध्र प्रदेशचा ३५ धावांनी पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्राची विजेतेपदाची गाठ उद्या राजस्थान संघाविरुद्ध पडणार आहे.गरवारे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ९ बाद १५६ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अभिलेष लोखंडे याने ४६ चेंडूंत ७ चौकारांसह ५२ व ज्योतीराम घुले याने २४ चेंडूंत ५ चौकारांसह ३४ धावा केल्या. जुनैद नेहरीने १८ व राहुल शिवरकर याने १३ धावा केल्या. आंध्र प्रदेशकडून सुरेंद्र याने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात आंध्र प्रदेशचा संघ १८.४ षटकांत १२१ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून व्हीसीएम रेड्डीने ४२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा करीत एकाकी झुंज दिली. नवीन याने २३ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्रकडून डी. जाधव याने २२ धावांत २ व विकी रणदिवे याने १६ धावांत ३ गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीत राजस्थानने तेलंगणा संघाचा ८0 धावांनी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. राजस्थानने प्रथम फलंदाजी करीत १९.४ षटकांत १६२ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून सुरेशने ५६ व नाज याने ४७ धावा केल्या. प्रत्युत्तरात तेलंगणाचा संघ १५ षटकांत ८२ धावांत गारद झाला. उद्या सकाळी ८.३0 वा. महाराष्ट्र व राजस्थान यांच्यात अंतिम सामना रंगणार असल्याचे आयोजन समितीतर्फे सय्यद जमशीद व संजीव बालय्या यांनी कळवले आहे.