औरंगाबाद : पुणे येथे गोवा संघाविरुद्ध ८ ते ११ डिसेंबदरम्यान होणाºया १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. ओम भोसले कर्णधारपद भूषवणार आहे.पुणे येथे महाराष्ट्राच्या संघाची घोषणा सचिव रियाज बागवान यांनी केली. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे- ओम भोसले (कर्णधार), हृषिकेश मोटकर, पवन शाह, अथर्व काळे (उपकर्णधार), यश क्षीरसागर, सिद्धेश वीर, स्वप्नील फुलपगर (यष्टिरक्षक), अतमन पोरे, समर्थ कदम, आकाश जाधव, यतीन मंगवानी, सिद्धेश वरघंटे, अक्षय काळोखे, तन्मय शिरोडे.
कुचबिहार करंडक लढतीसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:11 IST