शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सेंट जोन्स संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:57 IST

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने डी.व्ही.एम. संघावर ५२ धावांनी विजय मिळवला. दुसºया लढतीत सेंट जोन्सने टेंडर केअर होम संघावर मात केली.

औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने डी.व्ही.एम. संघावर ५२ धावांनी विजय मिळवला. दुसºया लढतीत सेंट जोन्सने टेंडर केअर होम संघावर मात केली.महाराष्ट्र पब्लिक स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ४ बाद १0८ धावा केल्या. त्यांच्याकडून अभिजित तोष्णीवालने २४ चेंडूंत ३ चौकारांसह ३२, प्रथमेश देवने १६ चेंडूंत ३ चौकारांसह नाबाद २४ व धीरजने नाबाद १४ धावा केल्या. डीव्हीएमकडून सूरज चव्हाणने २ गडी बाद केले. महेश निंबाळकर व ज्ञानेश्वर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात डीव्हीएम संघ १२.५ षटकांत ५६ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून महेश निंबाळकरने १८ चेंडूंत ३ चौकारांसह २२ धावा केल्या. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून तनुज सोळुंकेने ९ धावांत ३, तर आदित्य पाटील व कृष्णा ठोंबरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात टेंडर केअर होमने १५ षटकांत ८ बाद ९१ धावा केल्या. त्यांच्याकडून सार्थक अक्कर याने २ चौकारांसह २४ व शंतनू बºहाळे याने २१ चेंडूंत १ चौकार, एका षटकारासह २४ धावा केल्या. सेंट जोन्सकडून संयम नरवडेने ९ धावांत २ गडी बाद केले. अजय पांचाल, गौरव जैस्वाल, अभिषेक कांबळे व आकाश चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सेंट जोन्सने ७ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून संयम नरवडेने ३ चौकारांसह नाबाद २८ व देवांग अष्टुरकरने १५ धावा केल्या. टेंडर केअरने ३७ धावा या अवांतर स्वरूपात देताना पराभव ओढून घेतला. टेंडर केअरकडून सार्थक अक्कर याने ७ धावांत ४ व अनिष रे याने २ गडी बाद केले. शिवम काळेने १ गडी बाद केला.