औरंगाबाद : मुंबईच्या सचिन तेंडुलकर जीमखाना मैदानावर झालेल्या बीसीसीआयच्या सिनिअर महिला सुपर लीग वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. आज झालेल्या अखेरच्या लढतीत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४ धावांनी मात केली.या स्पर्धेत दिल्ली आणि महाराष्ट्राने चारपैकी ३ सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांचे १२ गुण समसमान होते; परंतु धावसरासरी जास्त असल्यामुळे दिल्लीचा संघ चॅम्पियन ठरला. आज झालेल्या लढतीत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय फलंदाज श्वेता जाधव, देविका वैद्य, कर्णधार अनुजा पाटील, श्वेता माने आणि मुक्ता मगरे यांनी महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले.बडोदा संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करणाºया महाराष्ट्राला जबरदस्त फॉर्ममध्ये असणाºया श्वेता जाधवने तेजल हसबनीस हिच्या साथीने ८.३ षटकांत ४५ धावांची भागीदारी करताना सुरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर श्वेता माने आणि अनुजा पाटील यांनी तिसºया गड्यासाठी केलेल्या ४१ धावांच्या भागीदारीच्या बळावर महाराष्ट्राने २0 षटकांत ५ बाद १0९ धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे श्वेता जाधव हिने सर्वाधिक ६ चौकारांसह ३४ चेंडूंत ३४ धावा केल्या.श्वेता माने हिने २१ चेंडूंत २ चौकारांसह २६, अनुजा पाटीलने २१ आणि तेजल हसबनीस हिने १६ धावांचे योगदान दिले. बडोदा संघाकडून तरुण्णम पठाण व राधा यादव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महाराष्ट्राने बडोदा संघाला २0 षटकांत ९ बाद ९५ धावांवर रोखताना शानदार विजय मिळवला. बडोदा संघाकडून यक्षिता भाटिया हिने ३२ चेंडूंत सर्वाधिक २४ व राधा यादव हिने १९ धावा केल्या.महाराष्ट्राकडून देविका वैद्य हिने ११ धावांत ४ गडी बाद केले. तिला कर्णधार अनुजा पाटीलने १८ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. बीडच्या मुक्ता मगरे हिनेदेखील सुरेख गोलंदाजी करताना ४ षटकांत फक्त १४ धावा दिल्या. उपविजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्र संघाचे विभागीय सचिव प्रदीप देशमुख, एमसीएचे उपाध्यक्ष चंद्रकांत मते यांनी अभिनंदन केले.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : २0 षटकांत ५ बाद १0९. (श्वेता जाधव ३४, श्वेता माने २६, अनुजा पाटील २१, तेजल हसबनीस १६. राधा यादव २/२२). बडोदा : २0 षटकांत ९ बाद ९५. (वाय. भाटिया २४, राधा यादव १९. देविका वैद्य ४/११, अनुजा पाटील ३/१८).
महाराष्ट्राला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:59 IST
मुंबईच्या सचिन तेंडुलकर जीमखाना मैदानावर झालेल्या बीसीसीआयच्या सिनिअर महिला सुपर लीग वनडे क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. आज झालेल्या अखेरच्या लढतीत महाराष्ट्राने बडोदा संघावर ४ धावांनी मात केली. या स्पर्धेत दिल्ली आणि महाराष्ट्राने चारपैकी ३ सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांचे १२ गुण समसमान होते; परंतु धावसरासरी जास्त असल्यामुळे दिल्लीचा संघ चॅम्पियन ठरला. आज झालेल्या लढतीत औरंगाबादची आंतरराष्ट्रीय फलंदाज श्वेता जाधव, देविका वैद्य, कर्णधार अनुजा पाटील, श्वेता माने आणि मुक्ता मगरे यांनी महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक योगदान दिले.
महाराष्ट्राला उपविजेतेपद
ठळक मुद्देवनडे क्रिकेट स्पर्धा : मराठवाड्याच्या श्वेता जाधव, मुक्ता मगरे, श्वेता माने चमकल्या