लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रोपवाटिकेच्या भाड्यापोटी ५४ हजार ९०० रूपयांचा धनादेश देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाºया वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामला एखंडे पाटील व त्यांचे पती शिवाजी गोविंदराव एखंडे पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या काबरानगर येथील राहत्या घरी बुधवारी रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २५ जुलै रोजी तक्रारदाराने आपल्या भावाच्या नावावर असलेल्या रोपवाटिकेच्या भाड्यापोटीचा धनादेश काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्यामला शिवाजी एखंडे पाटील या लाच मागत असल्याची तक्रार दिली़या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला़ २६ जुलै रोजी श्यामला एखंडे यांच्या काबरानगर येथील सी-६५ या राहत्या घरीच तक्रारदाराकडून ५४ हजार ९०० रूपयांच्या धनादेशासाठी २५ हजारांची लाच घेताना श्यामला एखंडे व त्यांचे पती शिवाजी गोविंदराव एखंडे पाटील या दोघांनाही लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आले़याप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात एखंडे दांम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस अधीक्षक संजय लाटकर व उपअधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पोलिस निरीक्षक बी़एल़ पेडगावकर, अशोक गिते, कपील शेळके, पोहेकॉ सुधीर खोडवे, नामदेव सोनकांबळे, बाबु गाजुलवार, साजिद अली, एकनाथ गंगातिर्थ आदींनी परिश्रम घेतले़
महिला वनपरिक्षेत्र अधिकाºयास पतीसह लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:29 IST