शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
3
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
4
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
5
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
6
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
7
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
8
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
9
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
10
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
11
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
12
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
13
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
14
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
15
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
16
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
17
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
18
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
19
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
20
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

मग्रारोह योजनेतील विहिरी अपूर्ण

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

इलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूर शासनाकडून मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना शेकडो विहिरी मंजूर केल्या, परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विहिरी गेल्या

इलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूरशासनाकडून मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना शेकडो विहिरी मंजूर केल्या, परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विहिरी गेल्या चार वर्षांपासून पूर्णत्वाकडे गेल्या नसल्याने सिंचनक्षेत्र वाढूनही शासन दरबारी सिंचन क्षेत्रात वाढ झाली नसल्याचा अहवाल गेला़माहूर तालुक्यात वनजमिनीसह ३४ हजार ४०० हेक्टर जमीन शेती करण्यालायक आहे, पैकी कृषी विभागाच्या माहितीनुसार ५ हजार २०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे़ मग्रारोहयो योजना लागू झाल्यानंतर सन २०११ वर्षापासून या योजनेतून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी देण्यात आल्या़ कुशल अकुशलच्या भानगडीत ६० टक्के अकुशल व ४० टक्के कुशल देयकांचे प्रमाण राखण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश न आल्याने सन २०११ पासून कुशल देयके देण्यात न आलयाने या विहिरी पूर्ण होवून सिंचनक्षेत्र वाढूनही विहिरी अपूर्ण असल्याचे भिजत घोंगडे कायम आहे़माहूर तालुक्यात ६२ महसुली गावे व या गावांना जोडलेल्या ६० गावांपैकी फक्त ५४ गावांतील ७३६ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान देण्यात आले़ यापैकी त्रुटीत ३०७ प्रगतीपथावर ५० अपूर्ण ६७७ तर ९ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत़ यात अंजनखेड येथे-९, आष्टा-१९, आसोली-२६, बंजारा तांडा-१९, भगवती-९, भोरड- ७, बोंडगव्हाण-२, बोरवाडी-४२, चोरड-१२, दिगडी कुत्तेमार-३, दिगडी धानोरा-१०, ईवळेश्वर-२४, गोंडवडसा-७, गोकुळ गोंडेगाव-१०, गुंडवळ-१६, हडसणी-२०, हिंगणी-८, करंजी-५, कुपटी-२६, लखमापूर-२९, लांजी-३, लसनवाडी-२७, लिंबायत-५, लोकरवाडी-६, मच्छिंद्रपार्डी-५, मदनापूर-२१, मेंढकी-७, महादापूर-१०, मांडवा-१५,मेठ-११, मुंगश्ी-१३, मुरली-८, पाचुंदा-२६, पडसा-१, पानोळा-१९, पापलवाडी-१७, रूई-३, समीगुडा-६, रूपलानाईक-२०, रुपानाईकतांडा-११, साकूर-५, सेलू-११, शेकापूर-४, शेखफरीदवझरा-५, सिंदखेड-१६, टाकळी-२, तांदळा-२३, तुळश्ी-१६, उमरा-६, वडसा-३, वाईबाजार-१, वानोळा-२८, वसरामनाईक तांडा-१९, वायफनी-६ या गावांना विहिरी देण्यात आल्या आहेत़या विहिरीधारकांना १ लाख ८७ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरलेले असताना यापैकी अनेकांना १ लाख रुपयापर्यंत अकुशल देयके देण्यात आली़ उर्वरित रक्कम कुशल या नावावर अडकवून ठेवण्यात आली आहे़ १५ कोटी रुपये देणे असताना फक्त ७ कोटी देण्यात आल्याची माहिती असून अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसल्यास अस्मानी संकटात नुकसान होणार आहे़ परिणामी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून कारण दोन लाख रुपयांत विहीर होणे शक्य नसल्याने उर्वरित रक्कम मिळेल या आशेने प्रत्येक शेतकऱ्याने व्याजाने लाखो रुपये घेवून विहिरी पूर्ण केल्या आहेत़