शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल बॅटरी स्फोटात मदरशातील विद्यार्थी जखमी

By admin | Updated: March 31, 2017 18:53 IST

मोबाईल बॅटरी चार्जिंग सुरू करून त्यावर गेम खेळणे एका बालकाच्या जिवावर बेतले.

ऑनलाइन लोकमत/बापू सोळुंके औरंगाबाद, दि. 31 - मोबाईल बॅटरी चार्जिंग सुरू करून त्यावर गेम खेळणे एका बालकाच्या जिवावर बेतले. मोबाईलवर गेम खेळत असताना अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने 12 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मिटमिटा येथील काशीफवाद या मदरशात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)घटनास्थळी धाव घेतली.मुदस्सीर मुक्तार शेख (12, रा. सादातनगर, पडेगाव)असे जखमी बालकाचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुदस्सीर एक वर्षापासून धार्मिक शिक्षण घेण्यासाठी मिटमिटा येथील काशीफवाद या मदरशात राहतो. आज शुक्रवारी मदरशाला साप्ताहिक सुटी असते. यामुळे त्याच्यासह अन्य विद्यार्थी दुपारी खेळत होते. काही जण प्रार्थनेसाठी मशिदीकडे गेले होते तर काही विद्यार्थी अभ्यास करीत होते आणि मुदस्सीर मोबाईलवर गेम खेळत होता. साप्ताहिक सुटीमुळे मदरशातील सर्व शिक्षकही तेथे उपस्थित नव्हते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक मुदस्सीरने त्याच्या हातातील मोबाईल बॅटरी चार्जिंगसाठी लावला आणि तो मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात त्याचे तोंड आणि दोन्ही हाताला गंभीर जखमा झाल्या. त्याचे ओठ, नाक आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. या स्फोटाच्या आवाजामुळे तेथे खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुदस्सीरकडे पाहिले आणि त्यांनी आरडाओरड केली. यामुळे तेथील शिक्षक तिकडे धावले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत मुदस्सीरला घाटीत दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांसह मदरशाचे संचालक मोईजोद्दीन फारुखी यांनीही घाटीत धाव घेतली. याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे म्हणाले की, हा मोबाईल बॅटरीचा स्फोट आहे. आम्ही या घटनेची चौकशी करीत आहोत. छावणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.मदरशात मोबाईल वापरण्यास मनाई - मोईजोद्दीन फारुखीमदरशाचे संचालक मोईजोद्दीन फारूखी यांनी या घटनेविषयी सांगितले की, मदरशात मोबाईल वापरण्यास मनाई आहे. मात्र काही विद्यार्थी चोरून मोबाईल वापरतात आणि मोबाईलवर गेम खेळतात. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास मुदस्सीर मोबाईलवर खेळत होता.यावेळी त्याने मोबाईलची बॅटरी तोंडात पकडल्याने स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आम्ही याघटनेची माहिती घेत आहोत.