शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून दागिने लंपास

By admin | Updated: January 7, 2017 00:09 IST

लातूर : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील तीन महिलांना वाटेत अडवून मारहाण करीत चौघांनी दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लातूर : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील तीन महिलांना वाटेत अडवून मारहाण करीत चौघांनी दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील अहिल्याबाई चाटे, गिरिजाबाई चाटे, अंजनाबाई चाटे या महिला केंद्रेवाडी शिवारातून सोनखेड-मानखेडकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्या शेताकडे जात होत्या. दरम्यान, केंद्रेवाडी शिवारात अंकुश चामे, लहू चामे, अक्षय चामे आणि मधुबाला चामे (सर्व रा. चिखली) यांनी रस्त्यात अडवून या तीन महिलांना जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे डोके फोडले. गळ्यातील सहा ग्रॅमच्या सोन्याची पोत हिसकावून पळविले. घाबरलेल्या महिलांनी या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. या प्रकरणी राजेंद्र भानुदास चाटे (रा. चिखली) यांच्या फिर्यादीवरून अंकुश चामे यांच्यासह अन्य तिघाविरोधात किनगाव पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ तलेदवार हे करीत आहेत. महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चिखली परिसरात खळबळ उडाली आहे.