बीड : महिन्याला पेन्शन मिळवून देतो, असे म्हणून एका ठगाने वृध्द महिलेचा एक लाख ११ हजार रूपयांचा ऐवज लुटला. ही घटना रविवारी दुपारी येथील बसस्थानकात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वत्सला लक्ष्मण कदम (रा. विद्यानगर, बीड) ही वृद्ध महिला रविवारी दुपारी गावाकडे जाण्यासाठी बीडच्या बसस्थानकात थांबल्या होत्या. सदर महिलेस एका चोरट्याने नातेवाईकाची ओळख दाखवत तुम्हाला महिन्याला चार हजार रूपये पेन्शन मिळवून देतो असे म्हणून त्याने वत्सला कदम यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी व नगदी एक हजार रूपये असा एक लाख ११ हजार रूपयांचा ऐवज लुटला.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कदम यांनी शिवाजीनगर ठाणे गाठले. (प्रतिनिधी)
पेन्शनच्या आमिषाने प्रवाशी वृद्धेला लुटले
By admin | Updated: February 8, 2016 23:58 IST