हरी मोकाशे जालना‘टिकली’च्या जमान्यात सौभाग्याचं लेणं असलेल्या कुंकुवाचा उपयोग ‘नावालाच’ होत आहे. ग्रामीण भागातील बुजुर्ग सौभाग्यवती आजही कुंकवाचा उपयोग करीत आहेत. मकरसंक्रांतीच्या सणासाठी टिकली वापरणाऱ्या सुवासिनींचीही हळदी- कुंकुवाला मागणी असते. परंतु, शहरातील बाजारपेठेत कुंकवाच्या नावाखाली लाल रंगाचीच विक्री सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.मकरसंक्रांतीच्या सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ हळदी-कुंकू, तीळ-गूळ, हलवा यासह भेटवस्तूंच्या साहित्यांनी गजबजलेली शुक्रवारी पहावयास मिळाली. एरव्ही कुंकवाचा उपयोग केवळ पूजेसाठीच वापरणाऱ्या महिलांकडून खास सणासाठी हळदी आणि कुंकुवाची होत असल्याने बाजारपेठेत आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, बाजारपेठेतील बहुतांशी ठिकाणी विक्री होणारा कुंकू हा लाल रंगमिश्रित आहेत. जालन्याच्या बाजारपेठेत हळदी आणि कुंकवाची आवक ही पंढरपूर, केम येथून होते. कुंकवाचा दर हा ४० ते १२० रुपये प्रति किलो आहे. कमी दराचा कुंकू हा रंगमिश्रित असून याच कुंकवाच्या विक्रीवर भर देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पूजेसाठीच्या हळदीचा दर हा ४० रुपये प्रतिकिलो आहे. बनावट कुंकवाच्या विक्रीकडे अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
सौभाग्याचं ‘लेणं’च निघतंय बनावट !
By admin | Updated: January 14, 2017 00:30 IST