औरंगाबाद : महापालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षांवर उमेदवार आयात-निर्यात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वॉर्डात मागील अनेक वर्षांपासून निष्ठावान म्हणून वावरणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘नारळ’ मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बाहेरील उमेदवाराला आतापासून विरोध करण्याची भूमिका अनेकांनी घेतली आहे. पक्षाने बाहेरून उमेदवार दिला तर बंडखोरी करण्याची तयारीही अनेकांनी ठेवली आहे. एकीकडे युती करण्याचे सूतोवाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे निष्ठावान व स्वतंत्र तयारी करण्याच्या बाजूने असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी पसरली आहे. युती झाली तर संधी जाणार आणि युती नाही झाली तर बाहेरचा उमेदवार येणार. ४अशा परिस्थितीत काय करावे हे कळण्यास मार्ग नसल्यामुळे अनेकांनी अपक्ष गट तयार करून एकाच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
निष्ठावानांना मिळणार नारळ
By admin | Updated: February 10, 2015 00:34 IST