शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पातळीने गाठला निचांक

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक

राजेश खराडे, बीडजिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक बाब जिल्हा सर्व्हेक्षण कार्यालयाने केलेल्या पहाणीतून समोर आली आहे. उंबऱ्यावर येऊन ठेपलेला दुष्काळ नागरिकांचा घसा कोरडा करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जून महिन्यात पडणारा पाऊस उशीरा सुरु झाला. त्यामुळे पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेली पीक वाया गेले. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडले या आशेवर पुन्हा पेरण्या केल्या. मात्र पावसाने आॅगस्ट महिन्यात डोकेवर काढले. जवळपास दोन ते अडीच महिने पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी पातळी खालावली होती. आॅगस्ट महिन्या झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी होते. जिल्हा भुजल सर्व्हेक्षण कार्यालयाने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पाणी पातळी मायनस म्हणजेच समान पाणी पातळीच्या खाली गेली आहे. वडवणी तालुका वगळता दहा तालुक्याची पाणी पातळी -१ व -० च्या खाली गेली असल्याची बाब समोर आली आहे. पावसामध्ये सातत्य न राहिल्याने २०१२ सालानंतर प्रथमच जिल्ह्यातील विहीरींची भुजल पातळी मायनस मध्ये गेली आहे. पाण्यची पातळीचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातून १२६ विहीरींची निवड करण्यात आली होती. वडवणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील भुजल पातळी ही प्लसमध्ये आहे इतर सर्वच तालुक्यातील पाण्याची पातळी खालवल्याने पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. गतवर्षीच्या तुलनेत दोन ते तीन मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी पातळी खालावली असल्याने पुढील काळात जमिनितून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध राहिलच याची शाश्वती आता तरी देता येणार नाही. नदी, तलाव, बंधारे यांच्या काठची गावे किंवा शिवार वगाळता इतर ठिकाणी बोअर व जमिनीतून पाणी मिळेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे. जमिनीतून पाणी निघाले नाही परिस्थिती आणखिनच गंभीर होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बोअर व विहिरीचे पाणी जपुन वापरणे हा एकमेव पर्याय आहे. पिके उगवली पण वाढ खुंटलीशेतकऱ्यांवरील संकाटाची मालिका संपता संपेना झाली आहे. चार महिन्यांच्या पावसाळ्यात जवळपास पंचवीस दिवस पाऊस पडला. याच पावसावर जिल्ह्यात रबीची ५० टक्के पेरणी झाली आहे. मात्र जमिनीत ओलावा नसल्याने या हंगामातील सर्वंच पिकांची वाढ खुंटली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील पिके ऐन जोमात असतानाच गारपीटीने सर्व पिके भुईसपाट करत शेतकऱ्यांच्या हात तोंडाला आलेला घास हिरावून घेतला. समाधानकारक पाऊस न झाल्याने सबंध मराठवाड्यातील शेतकरी चिंतातूर होता. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्या जोरावर जिल्ह्यात रबी हंगामातील पिकांचा पेरा झाला खरा परंतु पिकांना पाणी मिळत नसल्याने ही पिके करपू लागली आहेत. गतवर्षी जिल्ह्यात डिसेंबर अखेर सरासरी क्षेत्रांपैकी २ लाख ५४ हजार हेक्टरवर रबी हंगामातील पिकांची पेरणी झाली होती. पर्जन्यमानही शंभर टक्क्याच्या जवळपास असल्याने रबी हंगामातील बहुतांशी सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यांनी घटले आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १लाख ९६ हजार ४०० हेक्टरवर रबीची पेरणी केलेली आहे. पावसाळ्यातील पाणीसाठ्याच्या जोरावरच रबी हंगाम जोपासला जातो. मात्र भुजल पातळी खलावली आहे. जिल्ह्यातील वडवणी वगळता इतर तालुक्यात भुजल पातळी ही मायनस मध्ये आहे. त्यामुळे पिके जोपासायची कशी असवा सवाल उपस्थित होत आहे. रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र उत्पादन क्षेत्रात सर्वच पिकांत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याअखेर रब्बी हंगामातील पेरणी संपुष्टात आलेली असते. यामध्ये ज्वारी या प्रमुख पिकाची पेरणी सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३४ हजार पैंकी १ लाख ४० हजार हेक्टरवर करण्यात आली आहे. रबीची पेरणी समाधानकारक झाली असली तरी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रबीच्या सर्वच पिकांवर धोक्याची घंटा वाजत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने शेतीसंबंधीचे सर्वच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ऐन पावसाळ्यातही चाऱ्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. हिरवा चारा तर दुरापास्त झाला आहे तर कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कडबा २७०० ते ३००० शेकड्याचा घरात पोहचला आहे. त्यामुळे शेतकरी चारा व पाणी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.