शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी पाश आवळतोय...!

By admin | Updated: May 30, 2017 00:36 IST

जालना : नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगण्यासाठी शिवार संवाद अभियान राबवित आहे. मात्र, राजकीय चिखलफेकित शेतकऱ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित होत आहे. नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील सुनील अण्णासाहेब रणपिसे या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.तीन वर्षांत जालना जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालास न मिळणारा भाव, बँकांचे वेळकाढून धोरण आणि खाजगी सावकाराचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन करून किंवा गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यातील वीस शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तर २०१७ मध्ये आत्महत्या केलेल्या १२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचा रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्याने ते शासकीय मदतीपासून अद्याप वंचित आहेत. कर्ज फेडल्यानंतरही जमिनीचा ताबा न सोडणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून मंठा तालुक्यातील हेलस येथील लक्ष्मीबाई विठ्ठल खराबे (४५) यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हाही दाखल झाला. या घटनेने सावकराचा फास किती शेतकऱ्यांवर आवळला जातोय, हे अधोरेखित होते. जिल्ह्यात आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक हे सावकार करीत आहेत. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली जमीन खरेदी केली जात असून, कर्जाची परतफेड करू न शकलेल्या अनेकांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.