शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

प्रेमाचा जांगडगुत्ता गं़़़

By admin | Updated: July 26, 2014 01:07 IST

भारत दाढेल, नांदेड पे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़ गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी

भारत दाढेल, नांदेडपे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी कवीसंमेलनात दरवळला अन रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला़ कवी केशव खटींग यांच्या निवेदनाने संमेलनात अधिकच रंगत आली़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कवी डॉ़ विठ्ठल वाघ होते़ डॉ़ जगदीश कदम, प्रा़ रविचंद्र हडसनकर, प्रा़ मनोज बोरगावकर, प्रा़ महेश मोरे, नारायण पुरी, महेंद्र शेळके या कवींची उपस्थिती होती़ ग्रामीण पे्रम कवितांची उधळण करीत सर्वच कवींनी रसिकांनी उत्स्फुर्त दाद मिळविली़ प्रारंभी, विठ्ठल वाघ यांनी ओलीत ही कविता सादर करून वातावरण गंभीर केले़ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भ देत वाघ म्हणाले, शेकडो शेतकरी आत्महत्या करू द्या म्हणून विनंती करत आहेत़ ही शोकांतिका आहे़ शेतकऱ्यांच्या वेदनांची दाह मांडणारी ओलित ही कविता त्यांनी सादर केली़ कोरडे जे शेत आहे, ओलेच झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुखया, बोलेत आले पाहिजे़़सामाजिक, राजकीय परिस्थितीची उकल करताना विसंगतीचे कसे दर्शन होते, याचे वास्तव डॉ़ जगदीश कदम यांनी आपल्या कवितेतून मांडले़ काय राव बाता हाणता, अन म्हणल तर म्हणल म्हणता़़़ सहज, सोप्या शब्दांची कवितेत गुंफन करीत कदम यांनी राजकीय नेते, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे खोटे वर्तन उघडे पाडले़ रविचंद्र हडसनकर यांची ‘माय भक्का भक्का करीत गाडी ठेसणात आली’ ही कविताही दाद मिळवून गेली़ ठेसनात आलेल्या वऱ्हाडाचे चित्रण करताना मानवी भाव- भावनांचा अविष्कार त्यांनी प्रकट केला़ प्रा़ मनोज बोरगावकर यांनी ‘बाई माणसाला जळण्यासाठी फारसे लाकडे लागत नाहीत़़़ कारण आयुष्यभर ती जळतच राहते ’़़़ ही वेगळ्या आशयाची ‘मी जातच राहिल प्रेत यात्रेला’़़़ ही कविता सादर केली़ तुळजापूर येथील नारायण पुरी यांची जांगडगुत्ता ही कविता वन्समोअर झाली़ तु मनसेचे एैलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये, मी वेळ हातावर आलेली, तु कमळापरी बेभान प्रिये़़़ तु सत्ताधारी माजोरी, मी हाताशलेली जनता गं़़़ कवी केशव खटींग यांनी ‘आस लागली संसाराची मनी गं़ अन रानात राबतोय कुणबीनीचा धनी गं़’़़ ही कविता सादर केली़ या कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले़ खटींग यांच्या सूत्रसंचालनाने प्रभावी ठरलेल्या कवीसंमेलनात हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे यांनीही आपल्या कलेद्वारे रसिकांची मने जिंकले़ आयोजक माधव पावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले़