शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘लव्ह औरंगाबाद’ डिसप्ले तोडणारा मद्यपी अटकेत; अफवांना पूर्णविराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:24 IST

ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर शहरातील अन्य ठिकाणचेही ‘डिसप्ले’ फोडण्यात आल्याच्या अफवा पसरल्या.

ठळक मुद्देदारुच्या नशेत कृत्य, राजकारण नाही 

औरंगाबाद : स्मार्टसिटी अंतर्गत छावणीमध्ये नेहरू पुतळ्यासमोर उभारण्यात आलेला ‘लव्ह औरंगाबाद’ हा ‘डिसप्ले’ सोमवारी उत्तररात्री एका माथेफिरुने दारुच्या नशेत तोडून टाकला. दरम्यान, छावणी ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तपासाची सूत्रे गतीमान करत ताेफखाना परिसरातील रहिवासी विष्णू काळे यास अटक केली. 

स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने औरंगाबाद शहराच्या वैभवात भर पडावी म्हणून सर्वत्र अशाप्रकारचे ‘डिसप्ले’ उभारले आहेत. छावणी येथे पंडित नेहरु यांच्या पुतळ्यासमोर देखिल अशाप्रकारचा ‘डिसप्ले’ लावण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी उत्तररात्री दारुच्या नशेत विष्णू काळे या माथेफिरुने हा ‘डिसप्ले’ तोडून टाकला. ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर शहरातील अन्य ठिकाणचेही ‘डिसप्ले’ फोडण्यात आल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे पोलिसांनी तातडिने विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या अशा‘डिसप्ले’ची पाहणी केली व त्याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही शहरातील ‘डिसप्लें’ची पाहणी केली.

दारुच्या नशेत कृत्य, राजकारण नाही टीव्ही सेंटर चौकात ‘लव्ह संभाजीनगर’ असा ‘डिसप्ले’ लावण्यात आल्यामुळे काही जणांनी ‘औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर’ असा वाद उगाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वत: मनपा आयुक्तांनी या वादात कोणतेही तथ्य नसल्याचे जाहीर केल्यानंतर ते प्रकरण तेथे मिटले. कालच्या या घटनेला देखिल काहीजणांनी त्या वादाची किनार असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. मात्र, स्वत: पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी यासंदर्भात सदरील तरुण हा दारुच्या नशेत होता. नशेतच त्याने रात्री हा ‘डिसप्ले’ तोडला. यामध्ये कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा केला आहे.