शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरवले

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवर प्रवेश केल्याने या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांशी आॅनलाईन संवाद साधण्यात मग्न असतात. आता ग्रामीण भागातही सगळीकडे व्हॉटसअ‍ॅपचे वेड पसरले आहे. आता तर चौदा-पंधरा वर्षांची मुले स्मार्ट फोनच्या आहारी पडले आहे. या वयात मुलांना शिक्षण घेण्याची गरज असते; पण या वयात त्यांना व्हॉटसअ‍ॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आपल्या मुलांना आळा घालायला पाहिजे. माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्कींग गरजेपेक्षा जास्त वापर होत असून विद्यार्थी व तरुण पिढीला या गोष्टीचे व्यसन जडले आहे. काही वेळेस त्याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. इंटरनेट जमाण्यात तरुण पिढी मैदानी खेळाकडे दिवसेंदिवस विसर पडत आहे. इंटरनेट माध्यमांमुळे विकासाला चालना मिळत आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी संपर्कात राहून आपल्या संवाद साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा वापर करीत आहे. आता स्मार्ट फोनच्या रुपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा जास्त जास्त वापर करण्यात आजच्या युगातील तरुण पिढी आघाडीवर दिसून येत आहे. एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्याने त्याचे काही फायदे तर तोटेही होतात. नवनवीन माहिती प्राप्त होते. परंतु जास्त वापर केल्याने मानसिक आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक ठिकाणी समोरासमोर चर्चा रंगायच्या. यातून संवाद होऊन अनेक नावीन्यपूर्ण माहिती चर्चामधून व्हायची. परंतु आता इंटरनेट व्हॉटसप्अ‍ॅप,फेसबूक आदींमुळे कौटुंबिक, सामाजिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या चर्चा, प्रत्यक्ष संवाद हरवल्याचे चित्र दिसत आहे. मानवी जीवनात वरदान ठरलेल्या इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक विद्यार्थी व तरुण पिढी आघाडीवर आहे. (वार्ताहर)