शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:14 IST

शहरातील छत्रपती चौक ते मोर चौकादरम्यान अंबिकानगनरजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली़ अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिक अवाक् झाले़ तर रस्त्यातून उच्च दाबाने येणारे पाण्याचे लोट पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील छत्रपती चौक ते मोर चौकादरम्यान अंबिकानगनरजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली़ अचानक जलवाहिनी फुटून रस्त्यावर पाणी येत असल्याने नागरिक अवाक् झाले़ तर रस्त्यातून उच्च दाबाने येणारे पाण्याचे लोट पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़काबरानगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून नांदेड उत्तरमधील बहुतांश भागात पाणीपुरवठा केला जातो़ जलशुद्धीकरण केंद्रातून छत्रपती चौकाकडे जाणारी जलवाहिनी नरहर कुरूंदकरनगरच्या पाटीजवळ मुख्य रस्त्यावर फुटली़ यातील मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येत असल्याने दहा ते पंधरा मिनिटांमध्ये नरहरनगर पाटीपासून ते बजाजनगर पाटीपर्यंत रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते़डांबरी रस्त्यातून अचानक पाणी येत असल्याने सर्वजण चकित झाले़ पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता उखडून निघाला़ दरम्यान, लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचा संदेश सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे़ त्याचाच आधार घेत काहींनी भूकंपामुळेच पाणी रस्त्यातून पाणी येत असल्याची अफवा परिसरात पसरवली़ त्यामुळे येणाºया-जाणाºयांसह परिसरातील नागरिकांनी पाण्याचे लोट पाहण्यासाठी गर्दी केली़ परंतु, येथे उपस्थित असलेल्या विश्वजित पावडे, स्वप्निल जाधव, रोहन सुंडगे, बाळासाहेब देसाई आदी युवकांनी सदर पाणी पाईपलाईन फुटल्याने येत असल्याचे सर्वांना सांगितले़ तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली़