शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

झुंडशाहीमुळे चित्रपटसृष्टीचे नुकसान - चंद्रकांत कुलकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 19:08 IST

निर्मिती केल्यानंतर चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी पाठविण्यात येतो. तेव्हा निर्माता, दिग्दर्शक तणावाखाली असतो. सेन्सॉर समिती सदस्यांच्या डोक्यात काय येईल अन् काय खटकेल याचाच विचार करावा लागतो. यातही झुंडशाहीच्या दबावामुळे अनेक संवाद, चित्र कट करावे लागतात. हाच चित्रपटसृष्टीला सर्वांधिक धोका आणि नुकसान असल्याचे मत सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद, दि. 27 : निर्मिती केल्यानंतर चित्रपट जेव्हा सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीसाठी पाठविण्यात येतो. तेव्हा निर्माता, दिग्दर्शक तणावाखाली असतो. सेन्सॉर समिती सदस्यांच्या डोक्यात काय येईल अन् काय खटकेल याचाच विचार करावा लागतो. यातही झुंडशाहीच्या दबावामुळे अनेक संवाद, चित्र कट करावे लागतात. हाच चित्रपटसृष्टीला सर्वांधिक धोका आणि नुकसान असल्याचे मत सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालयातर्फे ‘सिनेमा, समाज आणि सेन्सॉरशिप’ या विषयावर रविवारी (दि. २७)  या एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मराठी सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वि. ल. धारूरकर होते. मंचावर ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके उपस्थित होते.

स्वत:वर सेन्सॉरशिप असावीचित्रपटाच्या परवानगीवेळी झुंडशाहीची सेन्सॉरशिप सर्वांधिक गंभीर असते. सत्तांतर झाले की, त्याठिकाणच्या सर्व समित्या बदलतात. आपल्या विचारांच्या लोकांची त्याठिकाणी वर्णी लावली जाते. त्या विचारातुनच सेन्सॉरचा त्रास सहन करावा लागतो, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. सध्या चित्रपट वेगाने बदलत आहे. त्यात काही सकारात्मक बदलही होत असल्याचे हि कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच आता आपण स्वत:च स्वत:वर एक  सेन्सॉरशिप घालून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोपात डॉ. धारुरकर यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये झालेल्या बदलाचा आढावा घेतला. या चर्चासत्राच्या आयोजनामागची भूमीका संयोजक प्राचार्या डॉ. रेखा शेळके  यांनी प्रस्ताविकात मांडली. डॉ. आशा देशपांडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी दोन सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली. चर्चासत्राचा समारोप ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दिक्षित यांच्या उपस्थितीत झाला. 

राज ठाकरेंचा गांधी चित्रपट आवडतामनसेप्रमुख राज ठाकरे यांचा सर्वांधिक आवडता  चित्रपट गांधी हा आहे. जे.जे. महाविद्यालयात शिकत असताना सलग महिनाभर दररोज न चुकता गांधी चित्रपटाचे शो पाहिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले, असे चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी चित्रपटातील विचारांचे आचरण कधीही केले नाही. यामुळे कोणाला कलाकृती आवडू शकते, विचार आवडत नसले तरी कलाकृतीचा सन्मान झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.