शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कर्मचा-यांच्या वेतनाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:30 IST

शासनाकडून यंदा ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम तब्बल सहा ते सात महिने उशिराने जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाली असून, वित्त विभागाने सदरील रक्कम सर्व नऊ गटविकास अधिका-यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना आता नियमित वेतन मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाकडून यंदा ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या वेतनाची रक्कम तब्बल सहा ते सात महिने उशिराने जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झाली असून, वित्त विभागाने सदरील रक्कम सर्व नऊ गटविकास अधिका-यांच्या खात्यांमध्ये वर्ग केली आहे. तथापि, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाºयांना आता नियमित वेतन मिळण्याची वाट मोकळी झाली आहे.ग्रामविकास विभागाकडून दरवर्षी दोन टप्प्यांत ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी सहायक अनुदानाची रक्कम प्राप्त होत असते. साधारणपणे वेतनाचा पहिला टप्पा एप्रिल- मे महिन्यात प्राप्त होत असतो. यावर्षी तो सात महिन्यांनंतर अर्थात गेल्या आठ दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशान्वये कर्मचाºयांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या सहायक अनुदानाची ३ कोटी २५ लाख १२ हजार रुपयांची रक्कम सर्व गटविकास अधिकाºयांच्या खात्यावर जमा करण्यात आली. कर्मचाºयांच्या वेतनाचा सहायक अनुदानाचा दुसरा टप्पा महिनाभरात प्राप्त होऊ शकते.प्राप्त ३ कोटी २५ लाख १२ हजार रुपयांपैकी औरंगाबाद तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या वेतनासाठी ४४ लाख ८५ हजार ८८४ रुपये, पैठण तालुक्यासाठी ३९ लाख ९८ हजार ९७५ रुपये, गंगापूर तालुक्यासाठी ४४ लाख ३८ हजार ९६१ रुपये, वैजापूर तालुक्यासाठी ४५ लाख ८० हजार ४०९ रुपये, कन्नड तालुक्यासाठी ४९ लाख ६० हजार ८९२ रुपये, सिल्लोड तालुक्यासाठी ४२ लाख ४६ हजार १७० रुपये, सोयगाव तालुक्यासाठी १७ लाख २० हजार १६१ रुपये, खुलताबाद तालुक्यासाठी १५ लाख ११ हजार ७२९ रुपये, फुलंब्री तालुक्यासाठी २५ लाख ६८ हजार ८१९ रुपये गटविकास अधिकाºयांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.सदरील रक्कम ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या किमान वेतनासाठी खर्च करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचना आहेत.