शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांची करुणा, मैत्री हीच सर्वांना प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:28 IST

बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश हाच भारतासह सर्व आशिया खंडातील राष्ट्रांसाठी प्रेरणादायी आहे. बुद्धांचा याच विचारांचा धागा भारताला सर्व बौद्ध राष्ट्रांसोबत जोडणारा आहे. आम्ही श्रीलंकन असलो, तरी बुद्धांची भूमी असलेला भारत देश हीच आमची मातृभूमी असल्याची भावना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्ष यांनी आज व्यक्त केली.बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री प्रा. जी. एल. पॅरिस, खा. लोहान रतवत्ते, खा. उदित लोकुबंडारा, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अमर साबळे, अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले होते.माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीमध्ये केली. त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल गौरपूर्ण विवेचन केले. भारताची राजमुद्रा तसेच राष्ट्रध्वजावर बौद्ध प्रतीकांचा समावेश आहे. श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून गणले जात असले, तरी तेथील संविधानाने त्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे श्रीलंकेमध्ये आज अल्पसंख्याक असलेला संप्रदाय सातत्याने बौद्ध राष्ट्र संबोधण्यास विरोध करीत आहे. परंतु बुद्धांचा विचार हा मैत्री, करुणा, शांतीचा आहे. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सर्व धर्म- संप्रदायाचे लोक एकोप्याने राहतात. या देशात बुद्धांचा जन्म झाला. परंतु भारतात बुद्धाच्या धम्माला फारसे संरक्षण मिळू शकले नाही.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा या फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भन्ते एम. धम्मज्योती थेरो यांनी केले. स्वागताध्यक्ष विजय मगरे, मनीष बागूल, प्रफुल्ल ढेपे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, खा. साबळे, पर्यटनमंत्री रावले, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मनोगत व्यक्त केले.