धारूर : शहरातील क्रांती चौक भागातील एका सराफा दुकानाचे शटर तोडून चोरांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास रोख रक्कम व दागिने असा तीन लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यावरुन पोलिसांनी तपास गतिमान केला आहे.अभिजीत रामचंद्र चिद्रवार यांचे क्रांती चौक या गजबजलेल्या भागात रुपेश ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दुचाकीवरून आलेल्या तीन चोरांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा असा तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अवघ्या १४ मिनिटांमध्ये चोर पसार झाले. चोरांनी सीसीटीव्हीत चेहरे येऊ नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले होते. शनिवारी सकाळी शटर वाकलेले असल्याचे निदर्शनास आल्यावर नागरिकांनी चिद्रवार यांना या घटनेची माहिती कळविली. धारुर ठाण्याचे निरीक्षक डी. जे. चव्हाण यांनी फौजफाट्यासह धाव घेतली. पंचनाम्यानंतर गुन्हा नोंद झाला. (वार्ताहर)
सराफा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास
By admin | Updated: February 4, 2017 23:33 IST