उस्मानाबाद : उस्मानाबाद बसस्थानकात चोरट्यांच्या रडारवर आले असून, सोमवारी एका महिलेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याच्या मण्यांसह पत्ता चोरट्यांनी लंपास केला़ तर मंगळवारी दुपारच्या सुमारास बँकेतून काढलेले पैसे घेऊन आलेल्या इसमाची दिशाभूल करीत दीड लाख रूपयांची पिशवी चोरट्यांनी लंपास केली़ या प्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी सांगितले की, औसा तालुक्यातील लिंबाळ (दासू) येथील नवनाथ बापूसाहेब देशमुख व त्यांची आई हे सोमवारी दुपारी लग्नकार्य उरकून गावाकडे जाण्यासाठी उस्मानाबाद बसस्थानकात आले होते़ गावाकडे जाण्यासाठी औसा बस लागल्यानंतर ते आत चढत असताना त्यांच्या आईच्या गळ्यातील चार ग्राम सोन्याचे मणी, पत्ता असा दहा हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ या प्रकरणी नवनाथ बापूसाहेब देशमुख यांनी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती़ या तक्रारीवरून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ उस्मानाबाद तालुक्यातील खामसवाडी येथील प्रकाश महादेव गुळवे हे मंगळवारी सकाळी उस्मानाबाद येथे आले होते़ शहरातील स्टेट बँक आॅफ इंडिया मधून त्यांनी एक लाख, ६० हजार रूपये काढून पिशवीत टाकले़ पिशवी घेऊन ते वैरागकडे जाण्यासाठी उस्मानाबाद येथील बसस्थानकात आले होते़ बसस्थानकातील पाण्याच्या टाकीजवळ अनोळखी इसमांनी त्यांच्या पाठीवर काहीतरी टाकले़ त्या दोघांनी मानेवर मुंग्या आहेत़ शर्ट काढून झटका असे सांगितले़ पाठीवर काहीतरी पडल्याचा भास झाल्याने गुळवे यांनी हातातील पिशवी पाण्याच्या टाकीवर ठेवली आणि शर्ट काढून झटकू लागले़ त्यावेळी त्या दोघांनी ती पिशवी घेऊन पळ काढला़ काही क्षणातच पिशवी गेल्याचे गुळवे यांच्या लक्षात आले़ मात्र, तोपर्यंत चोरटे गायब झाले होते़ या प्रकरणी गुळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार शहाणे हे करीत आहेत़ (प्रतिनिधी) दागिने प्रकरणाचा २४ तासांत उलगडा तपासाधिकारी हेकॉ रेखा मंजुळे, पोकॉ सुधाकर भांगे यांनी पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली कडूकर, सुरेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथे रात्री एक वाजण्याच्या सुमारास शिवनंदा मधुकर कसबे (राफ़ुलेनगर उदगीर जि़लातूर) या संशयित महिलेच्या घरावर छापा मारून तिला ताब्यात घेतले़ तर मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणातील दुसरा संशयित राजू विद्याधर नितळे (रा़बोरगाव काळे ता़जि़लातूर) यास मंगळवारी दुपारी तुळजापूर येथील बसस्थानकावर सापळा रचून जेरबंद केले़ मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता उस्मानाबाद बसस्थानकातील चोरी प्रकरणातील एका महिलेसह इसमास उस्मानाबाद शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे़ त्यांची कसून चौकशी सुरू असून, मंगळसूत्र चोरी प्रकरणातील मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़
महिलेचे दागिने लुटले
By admin | Updated: May 21, 2014 00:17 IST