शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांकडून लाखोंची लूट

By admin | Updated: July 3, 2017 01:04 IST

औरंगाबाद : ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वैध मापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागोपाठ तीन दिवस केलेल्या संयुक्त तपासणीत या आठवड्यात शहरातील तीन पेट्रोलपंपांची पेट्रोल चोरी उघडकीस आणली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ठाणे गुन्हे शाखा, शहर गुन्हे शाखा आणि वैध मापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लागोपाठ तीन दिवस केलेल्या संयुक्त तपासणीत या आठवड्यात शहरातील तीन पेट्रोलपंपांची पेट्रोल चोरी उघडकीस आणली. या पेट्रोलपंपांवर मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चीप बसवून मापापेक्षा कमी पेट्रोल देण्यात येत होते. दर पाच लिटरमागे ३० ते १५० मिली इंधन कमी देऊन महिन्याकाठी सुमारे ५ लाख रुपयांपर्यंत लूट झाल्याची शक्यता आहे.जालना रोडवरील चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंप, पुंडलिकनगर रोडवरील एस्सार पेट्रोल पंप आणि एपीआय कॉर्नर येथील भवानी आॅटो पंप या तीन पेट्रोल पंपांना सील ठोकण्यात आले आहे. ‘लोकमत’ने विविध पेट्रोल व्यावसायिकांकडून मिळवलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पेट्रोल पंपांवर दररोज तीन ते आठ हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असे.जालना रोडसारख्या वर्दळीच्या मार्गावर असणाऱ्या चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंपावर दिवासाकाठी येथे ६ ते ८ हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी २४ जून रोजी येथे सर्वप्रथम तपासणी केली असता दर पाच लिटरमागे १५० मिलीपर्यंत कमी पेट्रोल दिले जात असल्याचे त्यांना आढळून आले.प्रथमदर्शनी हे अत्यल्प प्रमाण वाटते. मात्र, दिवसाकाठी ६ हजार लिटर पेट्रोलची विक्री झाली असे जरी मानले तरी दिवसाला सुमरे १८० लिटर पेट्रोलची चोरी होते. पेट्रोलचे दर सरासरी ७५ रुपये गृहीत धरल्यास प्रतिदिन १३५०० रुपये तर महिन्याला सुमारे ४ लाख रुपयांचा अवैध नफा.‘थेंबे थेंबे तळे साचे’ असाच हा प्रकार आहे. याचप्रकारे रविवारी (दि.२५) केलेल्या तपासणीत एपीआय कॉर्नरवरील भवानी आॅटो पंपावर पाच लिटरमागे ३० मिली इंधन चोरी होत असल्याचे समोर आले. म्हणजे प्रतिलिटर ६ मिली पेट्रोलची चोरी.या पंपावर दिवसाकाठी ३ ते ४ हजार लिटर पेट्रोल विक्री होत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे किमान विक्री जरी गृहीत धरली तरी दिवसाला १३५० रुपये आणि महिन्याकाठी ४०.५ हजार रुपयांची लूट झाल्याची शक्यता आहे.पुंडलिकनगर रोडवरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपावरही एका दिवसातून सुमारे ४ हजार लिटर पेट्रोलची विक्री होते. येथे पाच लिटरमागे ५० मिली इंधन कमी दिले असे. म्हणजे महिन्याकाठी १२०० लिटर पेट्रोल चोरीतून ९० हजार रुपयांचा घोटाळा होत असे. शहरामध्ये सुमारे ३५ पेट्रोल पंप असून एका दिवसाला जवळपास ३.५ लाख लिटरची शहरात विक्री होते. पेट्रोलचा दर, प्रतिदिन पेट्रोल विक्री, इंधन चोरीचे प्रमाण या सर्व गोष्टी अनित्य असून सर्वसाधारण अंदाज बांधण्यासाठी त्यांचे काही ठराविक प्रमाण गृहीत धरण्यात आले आहेत.