शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजन; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे.

राजकुमार जोंधळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे. परिणामी, पुन्हा शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र, केंद्रावरील ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लातूरच्या गुळ मार्केट परिसरात तूर घेऊन आलेल्या काही वाहनांतील तूर अद्याप उतरवून घेण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना वाहन भाड्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकला आहे.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. परिणामी, बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा अधिक आवक झाल्याने अचानक दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र जिल्हाभरात सुरु केले. या केंद्रावर आतापर्यंत जवळपास २ लाख ४९ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्राची मुदत संपल्याने ती बंद करण्यात आली. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी झाली. पुन्हा हे केंद्र सुरु करुन, उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत होती. अखेर सोमवारी आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी तूर खरेदी केंदे्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट आणि निलंगा येथे हे खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.