शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

व्हाईट टॉपिंगच्या रस्त्याला भेगा

By admin | Updated: June 28, 2014 01:20 IST

औरंगाबाद : शहरात ५ रस्त्यांची कामे व्हाईट टॉपिंगने (काँक्रीट) सुरू आहेत. त्यापैकी सिडको कॉर्नर ते अहिल्यादेवी होळकर चौक, एन-४ या रस्त्याला भेगा पडल्याचा आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी

औरंगाबाद : शहरात ५ रस्त्यांची कामे व्हाईट टॉपिंगने (काँक्रीट) सुरू आहेत. त्यापैकी सिडको कॉर्नर ते अहिल्यादेवी होळकर चौक, एन-४ या रस्त्याला भेगा पडल्याचा आरोप सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी आज पाहणीदरम्यान केला. त्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना प्रशासनाने दिले. साईड ड्रेन, फु टपाथ, दुभाजकाचे काम व्यवस्थित होत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी कामाबाबत आक्षेप नोंदविला. आज सकाळी महापौर कला ओझा, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेते गजानन बारवाल, कार्यकारी अभियंता सिकंदर अली व प्रकल्प सल्लागार समितीच्या सदस्यांनी ५ ठिकाणच्या रस्त्यांची व ज्योतीनगर नाल्यावरील पुलाची पाहणी केली. जळगाव टी पॉइंट ते हर्सूल टी पॉइंटपर्यंतच्या सर्व्हिस रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर एसबीआय ते सेंट्रल नाका, क्रांतीचौक ते सिल्लेखाना ते पैठणगेट, पीरबाजार चौकातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. सभापती म्हणाले....रस्त्यांची किती कामे घेतली आहेत. कामांची डेडलाईन काय आहे. किती टक्के कामे झाली आहेत, याचा आढावा घेतला. पावसाळा लागला आहे. त्यामुळे मुदतीत कामे होणे गरजेचे आहे. साईड ड्रेनची कामे खोळंबलेली आहेत. फुटपाथ, दुभाजकाचे काम चांगले होत नसल्याचे पाहणीदरम्यान आढळून आले आहे. रस्त्यांच्या कामांची गती वाढविण्याचे आदेश दिले आहेत, असे सभापती विजय वाघचौरे यांनी सांगितले. १४ रस्त्यांची कामे पुण्याच्या जे. पी. कन्स्ट्रक्शन्सकडे ४० कोटी रुपयांतून व्हाईट टॉपिंगची कामे दिलेली आहेत. त्यातील ५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. ५० टक्के कामे झालेली आहेत.कंत्राटदाराला अद्याप एक रुपयाही मनपाने अदा केलेला नाही. कंत्राटदार एवढ्याच रस्त्यांची कामे पूर्ण करील, अशी चर्चा आहे. यावर सभापती म्हणाले, पूर्ण रस्त्यांची कामे पालिका करून घेईल.