नांदेड : शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किती सोनोग्राफी तज्ज्ञ सेवा देतात, याची माहिती घेण्यात यावी़ अशा हॉस्पिटलवर अधिक लक्ष देण्यात यावे व तेथे कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास चालक व मालक हेच कायदेशीर बाबीमध्ये पूर्णपणे जबाबदार राहतील, असा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियमान्वये समुचित प्राधिकारी सल्लागार समितीची बैठक नुकतीच महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात झाली़ अध्यक्षस्थानी डॉ़़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ़ एस़ आऱ वाकोडे तर मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ़ मीरा कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ़ सुप्रिया पंडित, डॉ़ किशोर राठोड, डॉ़ अमित पंचमहालकर, पोलिस निरीक्षक एस़ आऱ पवार, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे या सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती़ एकापेक्षा अधिक सोनोग्राफी तज्ज्ञ कार्यरत असलेल्या सोनोग्राफी केंद्रधारकांनी सोनोग्राफीतज्ज्ञांचे रूग्ण तपासणी वेळापत्रक सादर करावे़ सोनोग्राफी युनिट करीता पूर्णवेळ जबाबदार व्यक्ती व कायदेशीर प्रकरणे हाताळण्याकरिता केंद्राच्या जबाबदार व्यक्तीचे शपथपत्र घेण्यात यावे, असेही यावेळी ठरविण्यात आले़ समिती पुढे दाखल झालेल्या सात प्रकरणात नवीन सोनोग्राफी केंद्राना मान्यता देण्यात आली तसेच काही केंद्राच्या नूतनीकरण प्रस्तावास मान्यता देण्यात आली़ (प्रतिनिधी)बैठकीत दिली माहितीगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९३ अन्वये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात नोंदणीकृत १४० सोनोग्राफी केंद्र असून यापैकी ११० केंद्र सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली़
सोनोग्राफी सेंटरवर करडी नजर
By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST