शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:56 IST

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पोलीस, एसआरपी जवान, होमगार्ड आणि एक हजार विशेष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी शहर पोलीस सज्ज झाले असून, पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पोलीस, एसआरपी जवान, होमगार्ड आणि एक हजार विशेष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून पोलीस मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत.गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, मुख्य शहर, सिडको-हडको, मुकुंदवाडी, गारखेडा परिसर, सातारा परिसर आणि चिकलठाणा या वेगवेगळ्या विभागात स्वतंत्र विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. शहरातील संस्थान गणपती येथून निघणारी मिरवणूक ही मुख्य असते.या मिरवणुका शांततेत पार पडाव्या यासाठी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपायुक्त, ६ सहायक पोलीस आयुक्त, ४१ पोलीस निरीक्षक, ११८ पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, राज्य राखीव दलाची एक तुकडी, १८६५ पोलीस कर्मचारी, २०० महिला कॉन्स्टेबल, ४०० पुरुष आणि १०० महिला होमगार्ड यांच्यासह प्रथमच एनसीसी, एनएसएसचे जवान, एक हजार विशेष पोलीस अधिकारी यांची मदत घेतली जात आहे. यासोबतच दंगा काबू वज्र आणि वरुण वाहन, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी केली जात आहे.गर्दीच्या ठिकाणांवर साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचाºयांची गस्त सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.