शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर

By admin | Updated: April 17, 2017 23:35 IST

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत.

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाने जय्यत तयारी केली असून, संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २२ मार्च रोजी जाहीर झाल्यापासून आयोगाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून, १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लातूर शहरात ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक कंट्रोल युनिट व उमेदवार संख्येवरून बॅलेट युनिट मतदान केंद्रांवर १८ एप्रिल रोजी सायंकाळी पोहोचविले जाणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकूण २ हजार २८३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान अधिकारी, सहाय्यक आणि अन्य ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीनवेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांमार्फतच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ३७१ मतदान केंद्रांपैकी ८९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही राहणार आहे.