शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लांबरवाडीत आठ, इंजेगावात तीन घरे फोडली

By admin | Updated: December 14, 2015 23:56 IST

पाटोदा/परळी : लांबरवाडी ता. पाटोदा व इंजेगाव ता.परळी येथे रविवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत अनुक्रमे ८ व ३ अशी ११ घरे फोडली. दोन्ही गावांमधून लाखोंचा ऐवज पळविला आहे.

पाटोदा/परळी : लांबरवाडी ता. पाटोदा व इंजेगाव ता.परळी येथे रविवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घालत अनुक्रमे ८ व ३ अशी ११ घरे फोडली. दोन्ही गावांमधून लाखोंचा ऐवज पळविला आहे. लांबरवाडी येथील बहुतांश लोक ऊसतोडीसाठी गेले आहेत. घरात कोणी नसल्याचा चोरट्यांनी त्यांची घरे निशान्यावर धरत वस्तीवरील तीन घरांचे कुलूप तोडले. घरातील पेटया, डब्बे आदी साहित्या घेऊन गेले व जवळच्या मोकळ्या परिसरात ते उघडून त्यातील सोन्या-चांदीचे साहित्य नेले. त्यानंतर त्यांनी गावातील इतर घरांकडे मोर्चा वळविला. पाच घरे फोडली. प्रकाश बळे, सुखदेव लांबरुड ,भास्कर लांबरुड, आबासाहेब लांबरुड, दादासाहेब आजबे, रघुनाथ आजबे, विठ्ठल लांबरुड, रावसाहेब लांबरुड आदींच्या घराचा समावेश आहे. चोरट्यांनी सोन्याची कर्ण फुले ,मनी,नगदी रुपये चोरुन नेले. आठ घरातून लाखोंचा ऐवज चोरीस गेला आहे. अंमळनेर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र गुन्हा नोंद झाला नव्हता.इंजेगावातील संतोष कराड, विनायकराव कराड, बालासाहेब कराड या तिघांच्या घरात चोरट्यांनी हात साफ केला. सोमवारी पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन कपाटातील सोन्याचे दोन तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे मिनी गंठण, पाच ग्रामची आंगठी, चैन, कानातले असा एक लाख आकरा हजार रुपये किमतीचा एैवज ताब्यात घेतला व शेजारीच असलेल्या विनायक कराड यांच्याही खोलीतून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागीने घेवून जवळच असलेल्या बाळासाहेब कराड यांच्या घराकडे मोर्चावळवीत तेथेही हात साफ केला. एकूण तीन लाख सतरा हजार नऊशे रुपये किमतीचा ऐवज पळवून नेल्याची तक्रार संतोष कराड यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. (वार्ताहर)